AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजता… अहिर यांच्या फुटीनंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अहिर यांच्या या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अहिर यांनी अर्जही भरला. ठाकरे गटातील नेत्यांनी यावर आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे, ज्यामुळे पक्षांतरामुळे निर्माण झालेला राजकीय हादरा स्पष्ट दिसतो.

सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजता... अहिर यांच्या फुटीनंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?
अहिर यांच्या फुटीनंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jun 30, 2026 | 2:03 PM
Share

अवघ्या 10- 12 दिवसांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदार फोडणारे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचा स्पीड काही कमी झालेला नाही. 6 खासादर शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचे विश्वासून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनीही आता डायरेक्ट शिंदे गटाची वाट धरली आहे. एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना फोडलं असून त्यांनी शिदे गटातही प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उरपस्थितीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्जही भरला. अहिर यांच्या तडकाफडकी जाण्यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला असून हा धक्का पचवत ठाकरे गटाच्या एकेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

आम्ही रात्री 9 पर्यंत सोबत होतो

सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, अहिर यांच्या फुटीमुळे त्यांना धक्का बसल्याचे शब्दांतून स्पस्ट जाणवत होते. ‘ सचिन अहिर आणिमी, आम्ही काल रात्री सोबतच होतो. रात्री ९ वाजता आम्ही सोबत गेलो. पण सकाळी त्यांनी असं केलं. त्याला काय करू शकतो?.’ असं म्हणताना त्यांच्या शब्दांतील खंत आणि आश्चर्य दोन्ही लपत नव्हतं.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा आम्ही फॉर्म भरलेला आहे. निवडणुकीचं उद्या बघू. वरळीत आव्हान निर्माण होणार नाही. वरळी शिवसेनेची आहे. सुनील शिंदेंनी सचिन अहिरांना पराभूत केलं होतं. त्यामुळे आव्हान नाही, असंही ते पुढे बोलता बोलता म्हणाले.

तर वैभव नाईक यांनीही अहिरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, एकनिष्ठ आहोत हे स्पष्ट केलं. ‘मला काही ऑफर आलेली नाही’. सर्व आमदार उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. उद्धव ठाकरेंसोबत जे एकनिष्ठ आहेत, ते एकनिष्ठच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आम्हाला हा झटका

अहिरांच्या जाण्यामुळे मोठा धक्का बसला असून मुंबई आमदार महेश सावंत यांनीही यावर स्पष्टपणे मत मांडलं.  आम्हालाही हा झटका बसलाय. आम्ही त्यांना भाऊ म्हणून आम्ही बोलायचो. पक्षाने सचिन भाऊंना आमदार केलं, त्यांच्यावर अन्याय केला नाही. पण तरीही ते तिकडे का गेले, त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला , माहिती नाही, असं म्हणताना सावंत यांच्या शब्दांतील नाराजी, निराशा लपत नव्हती.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर