AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन गतीमंद मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला बेड्या

ठाण्यातील कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एक 16 वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या श्रीकांत गायके याने 6 मार्च रोजी अतिप्रसंग केला. मुलगी गतीमंद असल्यामुळे केलेल्या कृत्याची कुणकुण कोणाला लागणार नाही असे समजून आरोपी गाफील होता.

अल्पवयीन गतीमंद मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला बेड्या
अल्पवयीन गतीमंद मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला बेड्याImage Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 5:55 PM
Share

ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग (Sexual harassment) करणाऱ्या एक व्यक्तीला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. श्रीकांत गणेश गायके असे या नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपीने 6 मार्च रोजी पीडित मुलीवर अतिप्रसंग केला होता. पोलिसांनी आरोपीविरोधात भादवी कलम 376 सह पोस्को (Posco) कलम 4, 6, 12 प्रमाणे गुन्हा नोंद करत 26 मार्च रोजी आरोपीला अटक केली. (Accused arrested for sexually assaulting a minor girl in Thane)

मुलीने घरच्यांना याची माहिती दिल्यानंतर कृत्य उघडकीस

ठाण्यातील कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एक 16 वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या श्रीकांत गायके याने 6 मार्च रोजी अतिप्रसंग केला. मुलगी गतीमंद असल्यामुळे केलेल्या कृत्याची कुणकुण कोणाला लागणार नाही असे समजून आरोपी गाफील होता. मात्र मुलगी ही पूर्ण गतीमंद नसल्यामुळे तिने आपल्यासोबत घडलेला प्रकाराबाबत कुटुंबीयांना काही प्रमाणात माहिती दिली. कुटुंबातील एका सदस्याने याबाबतची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बालक संरक्षण हेल्पलाईन नंबरवर फोन करून दिली.

या तक्रारीवरून जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी कळवा पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाला सुरुवात केली. पीडित मुलीची विचारपूस केल्यानंतर मुलीने त्या व्यक्तीचे थोडक्यात वर्णन सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून नराधम श्रीकांत गायके याला अटक केली. नराधम श्रीकांतला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.

मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेत अत्याचार

श्रीकांत गायके हा विवाहित असून तीन मुलांचा बाप आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच तो या परिसरात राहण्यासाठी आला असून तो नालेसफाई आणि बांधकाम सारखी मंजुरी काम करतो. या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर त्याची नजर पडली आणि त्यानंतर त्याने मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेत तिला चॉकलेटचे आमिष दाखवून बंद पडलेल्या मफतलाल कंपनीच्या जागेतील दांत झाडी झुडपातील एका खड्ड्यात तिच्यावर अत्याचार केला. (Accused arrested for sexually assaulting a minor girl in Thane)

इतर बातम्या

दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या

Parbhani Crime : परभणीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.