‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पालिका सतर्क, परदेशातून आलेल्यांनी माहिती देण्याचं आवाहन

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवाशाला 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटचीच लागण आहे की नाही, हे समजायला 7 दिवस लागणार आहेत.

'ओमिक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पालिका सतर्क, परदेशातून आलेल्यांनी माहिती देण्याचं आवाहन
'ओमिक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पालिका सतर्क
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 8:55 PM

अंबरनाथ : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पालिका सतर्क झाली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं असून गेले काही दिवस बंद असलेलं डेंटल कॉलेज कोव्हिड सेंटरही पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट सापडला असून तो दुसऱ्या लाटेतल्या डेल्टा व्हेरिएंट पेक्षाही अधिक घातक असल्याचा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवाशाला ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचीच लागण आहे की नाही, हे समजायला 7 दिवस लागणार आहेत. मात्र हा प्रवासी विमान प्रवासात 96 प्रवाशांच्या संपर्कात आला होता. तसंच मुंबई ते डोंबिवली असा टॅक्सीने प्रवास केला होता, अशा खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे मुंबईपासून ते ठाणे जिल्ह्यापर्यंतच्या सर्व शहरं आणि गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

डेन्टल कॉलेज कोव्हिड सेंटरचा एक ब्लॉक सध्या सुरू करण्यात आलाय

याच अनुषंगाने अंबरनाथ पालिकेने परदेशातून जर कुणी प्रवासी अंबरनाथला आले असतील, तर त्यांनी काही दिवस विलगीकरणात राहावं, आणि कोरोनाची काही लक्षणं जाणवली, तर तातडीने पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असं आवाहन केलंय. सोबतच अंबरनाथ पालिकेच्या डेन्टल कॉलेज कोव्हिड सेंटरचा एक ब्लॉक सध्या सुरू करण्यात आला असून तिथे तीन डॉक्टर्स कार्यरत करण्यात आले आहेत. तर रुग्णसंख्या वाढल्यास इतर विभागही एक ते दोन दिवसात सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे. ऑक्सिजनचा पुरेसा साठा करण्याची आणि हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याची यंत्रणा पालिकेकडे असून त्यामुळं सध्या काळजी करण्याचं काहीही कारण नसल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी दिली आहे.

नागरिकांनी गाफील राहू नये

सध्या अंबरनाथमध्ये ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव झालेला नसला, तरी नागरिकांनी मात्र गाफील राहून चालणार नाहीये. पहिल्या लाटेनंतर नागरिक कोरोना संपल्याच्या अविर्भावात वावरले आणि दुसरी लाट ही जास्त घातक ठरली. आता ‘ओमिक्रॉन’मुळे तिसरी लाट आलीच, तर ती दुसऱ्या लाटेपेक्षाही भयंकर ठरू शकते. त्यामुळं दुसऱ्या लाटेत बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, आयसीयू बेड मिळवण्यासाठी आपल्यावर जी काही वेळ आली होती, ती आठवून आत्तापासूनच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. (Ambernath Municipality is alert on the background of Omicron)

इतर बातम्या

विदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी, देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज : राजेश टोपे

Kdmc : परदेशातून रुग्ण उपचारासाठी आल्यास kdmc ला कळवण्याचं आवाहन, अफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोनाबाधित

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.