लोकहो, ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही धबधबा, तलाव किंवा धरण परिसरात जाऊ नका, अन्यथा…..

ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधेब, तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे (Ban on going to any waterfall lake or dam area in Thane district).

लोकहो, ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही धबधबा, तलाव किंवा धरण परिसरात जाऊ नका, अन्यथा.....
प्रातिनिधिक फोटो

ठाणे : ठाणे जिल्ह्यात अजूनही कोरोना पूर्णपणे ओसरलेला नाही. अशात सार्वजनिक आणि खाजगी जागेत एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादींमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधेब, तलाव या ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनाई आदेश जारी केला आहे (Ban on going to any waterfall lake or dam area in Thane district).

पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील विविध धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. बऱ्याचदा या भागांमध्ये जीवितहानीच्या देखील घटना घडल्या आहेत. दुसरीकडे राज्यात आता मान्सून दाखल होत आहे. याशिवाय राज्य सरकारने नुकतेच निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अशावेळी सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत (Ban on going to any waterfall lake or dam area in Thane district).

ठाणे जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी संचार करण्यास बंदी?

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन ठाणे जिल्ह्यातील खालील तालुका निहाय स्थळांना प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे :

1) ठाणे तालुक्यातील येऊर धबधबे, सर्व तलाव, कळवा मुंब्रा रेती बंदर, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा ही स्थळे आहेत.

2) मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवीधरण परिसर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापुर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेवे मुरबाड ही स्थळे आहेत.

3) शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ, कुंडन दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब) सापगांव नदीकिनारी कळंवे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे ही स्थळे आहेत.

4) कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी ही स्थळे आहेत.

5) भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर ही स्थळे आहेत.

6) अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी ही स्थळे आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गोष्टींना बंदी :

1) पावसात वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे यास बंदी राहील.

2) पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास आणि मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे आणि उघडयावर मद्य सेवन करणे यास बंदी राहील.

3) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

4) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे .सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिश हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

5) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर / उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करणे, यास मनाई करण्यात येत आहे (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)

6) नमूद केलेल्या ठिकाणी असलेले धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली 1 किलोमीटर परीसरात 8 जून 2021 ते पुढील आदेश होईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील, असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या :

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना, ठाणे महापालिका ऑन अ‍ॅक्शन मोड

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI