Kalyan Crime | पार्किंगमधून बाईक गायब, विचारले तर रेकॉर्ड बुकातील कागदच फाडला; मुजोर पार्किग चालकास पोलीस कोठडी

पार्किंग चालक महेश शिंदे याला बाईक कुठे गेली अशी विचारणा केली. तेव्हा शिंदे यांनी तुमच्याकडची पावती कुठे आहे. तेव्हा दत्ता यांनी त्यांची पावती हरवली असून तुमच्या पुस्तकातील नोंदी पहा, असे सांगितले. तेव्हा शिंदे याने त्याच्या नोंदणी पुस्तकात खडाखोड करुन नोंदीचा कागद फाडून टाकला.

Kalyan Crime | पार्किंगमधून बाईक गायब, विचारले तर रेकॉर्ड बुकातील कागदच फाडला; मुजोर पार्किग चालकास पोलीस कोठडी
पार्किंगमधून बाईक गायब, विचारले तर रेकॉर्ड बुकातील कागदच फाडला
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 11:09 PM

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंगमधून एक बाईक गायब झाली. जेव्हा बाईक मालकाने बाईक कुठे आहे अशी विचारणा पार्किग चालकास केली. तेव्हा पार्किग चालकाने नोंदणी पुस्तकातून बाईक ठेवल्याचा कागदच फाडला. या मुजोर पार्किंग चालकाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. महेश शिंदे असे या पार्किंग चालकाचे नाव आहे. सध्या गायब झालेल्या बाईकचा शोध घेत आहेत. धक्कादायक म्हणजे या पार्किगमध्ये सीसीव्हीटी आणि सुरक्षिततेची यंत्रणा नसल्याने पार्किंग अधिकृत आहे का याचाही पोलीस तपास करणार आहेत.

बाईकबाबत विचारले असता पार्किंग मालकाने नोंदणीचा कागद फाडला

कल्याणमध्ये राहणारे अप्पू दत्ता हे मुलूंडमध्ये भूमीअभिलेखा विभागात कामाला आहेत. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेची पार्किग आहे. या पार्किगमध्ये दररोज दत्ता त्यांची बाईक पार्क करतात आणि कामावर जातात. दररोज ते त्यांची बाईक रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभी करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे दत्ता आपली बाईक पार्किंगमध्ये उभी करुन कामाला निघून गेले. संध्याकाळी ते कामावरुन परतले तेव्हा त्यांची बाईक पार्किंगमध्ये नव्हती. पार्किंग चालक महेश शिंदे याला बाईक कुठे गेली अशी विचारणा केली. तेव्हा शिंदे यांनी तुमच्याकडची पावती कुठे आहे. तेव्हा दत्ता यांनी त्यांची पावती हरवली असून तुमच्या पुस्तकातील नोंदी पहा, असे सांगितले. तेव्हा शिंदे याने त्याच्या नोंदणी पुस्तकात खडाखोड करुन नोंदीचा कागद फाडून टाकला.

मुजोर पार्किंग चालकास चार दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकाराने व्यथित झालेले अप्पू दत्ता यांनी थेट कल्याण रेल्वे पोलिस ठाणे गाठले. त्याठिकाणी त्यांची तक्रार नोंदविली. याबाबत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शादरूल यांचे म्हणणे आहे की, एखादी बाईक चोरीला गेली, गायब झाली. बाईक गायब झाल्यानंतर बाईक मालकाची तक्रार योग्य आहे. भादवी 204 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पार्किग चालक महेश शिंदे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पार्किंगमध्ये सीसीटीव्ही नाही. तसेच आगीची घटना झाली तर सुरक्षितेची व्यवस्था नाही. पार्किग अनधिकृत आहे की, अधिकृत आहे याचाही तपास केला जाईल. बाईक गेली कुठे याचाही शोध घेतला जाईल. (Bike disappears from parking lot, Mujor parking owner in police custody)

इतर बातम्या

Mumbai Crime: कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडिओही काढला

Kalyan Crime : कल्याणमध्ये दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.