Covid19 vaccination in center in Thane : ठाण्यात ‘या’ 15 ठिकाणी मिळणार कोरोना लस, हॉस्पिटल्सची यादी एका क्लिकवर

ठाण्यातही महत्त्वाची रुग्णालये, हेल्थ सेंटर्स, तसेच सरकारी रुग्णालयांत कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. (corona vaccination centers thane)

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 13:41 PM, 2 Mar 2021
Covid19 vaccination in center in Thane : ठाण्यात 'या' 15 ठिकाणी मिळणार कोरोना लस, हॉस्पिटल्सची यादी एका क्लिकवर
सांकेतिक फोटो

ठाणे : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona vaccination) दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला. या लसीकरणासाठी राज्य सरकारनेसुद्धा कंबर कसली आहे. महत्त्वाच्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यातही (Thane) महत्त्वाची रुग्णालये, हेल्थ केअर सेंटर्स तसेच सरकारी रुग्णालयांत कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. (Corona vaccination list of all hospitals and health care centers in Thane)

देशभरात लसीकरणाच्या दुसरा टप्पा राबवला जातोय. या टप्प्यात 60 वर्षापेक्षा अधिक वय असणारे तसेच 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोना लस दिली जातेय. मात्र, कोरोना लस घ्यायची असेल तर त्यासाठी आधी कोव्हिन अ‌ॅप किंवा कोव्हिनच्या संकेस्थळावर जाऊन आधी नावनोदंणी करावी लागणार आहे. ठाण्यातही जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्यासाठी नावनोंदणी करावी, तसेच लसीकरणात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यात कोणत्या ठिकाणी लस मिळणार?

 1. आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, दादोजी कोंडदेव स्टेडियम
 2. ग्लोबल कोव्हिड हॉस्पीटल, साकेत
 3. कळवा हेल्थ सेंटर
 4. छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा
 5. रोजा गार्डेनिया हेल्थ सेंटर, घोडबंदर रोड
 6. किसान नगर हेल्थ सेंटर
 7. लोकमान्य नगर हेल्थ सेंटर
 8. पोस्ट कोव्हीड सेंटर, माजीवाडा
 9. वर्तकनगर हेल्थ केअर सेंटर
 10. शिळफाटा हेल्थ सेंटर
 11. कोपरी प्रसुती केंद्र
 12. मानपाडा हेल्थ सेंटर
 13. मनोरमा नगर हेल्थ सेंटर
 14. गांधीनगर हेल्थ सेंटर
 15. कौसा हेल्थ सेंटर

वरील सर्व रुग्णालयं तसेच हेल्थ सेंटर्सवर कोरोना प्रतिबंधक लस मिळेल. पण त्याआधी आपले नाव नोंदवणे गरजेचे आहे. ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ही लसीकरण केंद्र दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजपेर्यंत सुरु राहतील. या सर्व केंद्रांवर एक वैद्यकीय अधिकारी नेमलेला आहे. त्याच्या निगराणीखाली कोरोना लसीकरण पार पडत आहे.

दरम्यान, ठाणे परिसरात सोमवारी कोरोनाचे 135 नवे रुग्ण आढळले असून एकूण 139 जण कोरोनातून बरे झाले. माजीवाडी-मानपाडा येथे सर्वाधिक रुग्ण आढळळे असून येथील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

कोरोना लस घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 20 आजारांची यादी, 1 मार्चपासून याच आधारावर होणार लसीकरण