पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोल्सची झाकणं उघडू नका; ठाणे महापालिका आयुक्तांचे आवाहन

पावसाचे पाणी साचल्यास त्याचा निचरा होण्यासाठी मलवाहिनीवरील मॅनहोल्स उघडण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. ही बाब अत्यंत धोकादायक असून एखादी व्यक्ती मॅनहोल्समध्ये पडून जीवितहानी होवू शकते.

पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोल्सची झाकणं उघडू नका; ठाणे महापालिका आयुक्तांचे आवाहन

ठाणे : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यास पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने मलवाहिनीवरील मॅनहोल्स उघडण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. ही बाब अत्यंत धोकादायक असून एखादी व्यक्ती मॅनहोल्समध्ये पडून जीवितहानी होवू शकते. तरी कोणत्याही परिस्थितीत मलवाहिनीवरील झाकणे उघडू नयेत तसेच नागरिकांनी पावसात चालताना काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. (Do not open the manhole cover to allow water to drain, Appeal of Thane Municipal Commissioner)

मुसळधार पावसामुळे मलवाहिनीवरील मॅनहोल्सची झाकणे पाण्याच्या दाबामुळे मॅनहोल्सपासून बाजुला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातुन काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलवाहिनी चेंबर्सच्या झाकणाच्या खाली लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. तरीही, काही ठिकाणी चेंबर्सवरील आरसीसी झाकणे पाण्याच्या दाबामुळे बाजुला होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच त्वरीत उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईसह ठाणे पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात आज (18) आणि उद्या (19) मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेत. यावेळी सोसायट्याचा वाराही सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहावं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. विवार पूर्वमधील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आता पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातील काही भागात सकाळपासून तब्बल 160 ते 180 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

मुंबईत पावसाचा कहर, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जोर धरलेल्या पावसाचा मुंबईत अक्षरश: कहर सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह ठिकठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील मुलुंड परिसरात भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम (Mulund West) परिसरातील कलपादेवी पाडा परिसरातील वायदे चाळीत ही घटना घडली आहे. काल रात्री 8 च्या सुमारास वायदे चाळीतील संरक्षक भिंत कोसळली. यात एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला. दिलीप वर्मा (35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

संबंधित बातम्या : 

मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

VIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी

नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(Do not open the manhole cover to allow water to drain, Appeal of Thane Municipal Commissioner)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI