AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकल प्रवासात त्याचा मृत्यू झाला, ओळख कशी पटवायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता, पण एका…

सीएसएमटी टर्मिनस ते कर्जत लोकलमध्ये एका व्यक्तीचा आकस्मात मृत्यू झाला. पण ओळख पटवण्यासाठी एकही वस्तू इसमाकडे नव्हती. यामुळे त्याची ओळख कशी पटवायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता.

लोकल प्रवासात त्याचा मृत्यू झाला, ओळख कशी पटवायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता, पण एका...
क्षुल्लक कारणातून भररस्त्यात राडाImage Credit source: TV9
| Updated on: May 01, 2023 | 10:04 PM
Share

सुनील जाधव, डोंबिवली : घातपात, आकस्मात मृत्यूच्या घटना रोजच घडत असतात. पोलिसांसमोर प्रत्येक घटनेचा उलगडा करत पीडित आणि आरोपींची ओळख पटवण्याचे आव्हान असते. असेच एक आव्हान डोंबिवली लोहमार्ग पोलिसांसमोर होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला जाणाऱ्या लोकलमध्ये ठाणे ते डोंबिवली दरम्यान एका इसमाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी नेण्याआधीच इसमाचा लोकलमध्येच मृत्यू झाला. यानंतर इसमाचा मृतदेह डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेत पालिका रुग्णालयात पाठवला. मात्र सदर इसमाजवळ ओळख पटवणारी एकही गोष्ट नव्हती. यामुळे इसमाची ओळख कशी पटवायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. पण म्हणतात कानून के हाथ लंबे होते है. तसंच काहीसं झालं. पोलिसांची नजर इसमाच्या शर्टवर वस्तूवर पडली अन् अखेर मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांचा शोध लागला.

मेहबूब नासिर शेख असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मेहबूबच्या मृत्यूनंतर लोकलमधील प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मेहबूबकडे ओळख पटवण्यासाठी एकही खूण नव्हती. यामुळे पोलिसांसमोर त्याची ओळख कशी पटवायची हा प्रश्न होता.

‘असा’ लागला शोध

मयताची ओळख कशी पटवायची या विचारात असतानाच पोलिसांची पारखी नजर मेहबूबच्या शर्टवर पडली. शर्टवर फॅशन टेलर, वांगणी वेस्ट असा टॅग पोलिसांना दिसला आणि पोलिसांना आशेचा किरण दिसला. पोलिसांनी हा व्यक्ती वांगणी परिसरातील असावा, अंदाज लावून वांगणीमध्ये फॅशन टेलरचा शोध घेण्यास सुरवात केली. अखेर पोलिसांना फॅशन टेलर सापडला. पोलिसांनी त्याला मयत इसमाचा फोटो दाखवला असता तो त्याने ओळख पटवली. सदर इसमाचे नाव मेहबूब शेख असे असून, तो वांगणीमध्ये लक्ष्मी सोसायटीत राहत असल्याचे पोलिसांना कळले.

यानंतर पोलिसांनी टेलरला सोबत घेऊन मेहबूबचे घर गाठले. पोलिसांनी कुटुंबीयांना रुक्मिणीबाई रुग्णालयात येऊन मयताची ओळख पटवण्यास सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन ओळख पटवल्यानंतर मृतदेह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांच्या ताब्यात देण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने आणि पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. पिंगळे आणि के. टी. पाटील यांनी तपासात महत्वाची भूमिका बजावली.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.