AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बेड माझ्या गुडघ्यापर्यंत उडाला, स्लॅब कोसळला आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या’, स्फोटानंतर स्थानिकाने सांगितली आपबीती

डोंबिवलीत एमआयडीसी फेज 2 येथे अंबर केमिकल कंपनीत आज बॉयलरचा स्फोट झाला. त्यामुळे एकापोठापाठ एक असे तीन मोठे स्फोट झाले. या स्फोटात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. जवळपास दोन किमीपर्यंतची जमीन हादरली.

'बेड माझ्या गुडघ्यापर्यंत उडाला, स्लॅब कोसळला आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या', स्फोटानंतर स्थानिकाने सांगितली आपबीती
डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत भीषण स्फोट झाला
| Updated on: May 23, 2024 | 4:20 PM
Share

आपत्तीची झळ भीषण असते. ती किती भीषण असते ते आपण याआधीच्या आपत्तींमधून पाहिलं आहे. डोंबिवतील जी आज भयानक आपत्तीची घटना घडली ती देखील तितकीच भीषण आहे. डोंबिवली एमआयडीसीत फेस टू येथे असलेल्या अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी भीषण स्फोटाची घटना घडली. या घटनेमुळे मोठा हाहा:कार उडाला. या घटनेत कितपत जीवितहानी झाली आहे ते सध्या तरी समजू शकणं अवघड आहे. कारण अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर एकामागेएक अशा सलग तीन स्फोटांचा आवाज आला. हा आवाज इतका भीषण होता की दोन किमीपर्यंतची जमीन हादरली. अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. रस्तावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीने आजूबाजूच्याही कंपन्यांना भक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटानंतर परिसरातील इमारतींना कशाप्रकारे झळ बसली याची माहिती तिथल्या स्थानिकांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना दिली. कल्याण शहराचे काँग्रेस उपाध्यक्ष अजय खैरे हे देखील त्याच परिसरात राहतात. त्यांनी स्फोटानंतरची आपबीती सांगितली. “ही स्फोटाची घटना आज दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली. माझ्या घराचा बेड माझ्या गुडघ्यापर्यंत उडला. घरातल्या काचा सगळ्या फुटल्या आणि स्लॅब पडला. इतका घातक हा स्फोट होता”, असं अजय खैरे यांनी सांगितलं.

“याआधीदेखील दोनवेळा अशा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. एकदा इथेच आसपास एक कंपनी होती तिथे स्फोट झाला. तर एकदा जकात नाकाच्या इथे एक कंपनी होती तिथे स्फोट झालाय. तो स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज जवळपास कल्याणपर्यंत गेला होता”, अशी प्रतिक्रिया अजय खैरे यांनी दिली.

दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती

ही दुर्घटना अतिशय भयानक होती. स्फोटानंतर परिसरात असलेल्या इमारतींच्या काचा फुटल्या. विशेष म्हणजे इमारतींच्या ग्राउंड फ्लोअरला असलेल्या दुकानांना असलेले लोखंडी सटर आवाजामुळे निघाले. तसेच गाडीचे काच फुटले. सुदैवाने गाडीचालक या दुर्घटनेत बचावला. अनेक इमारतींचे पत्रे उडाल्याचीदेखील घडना घडली. स्फोट इतका भीषण असल्याने कंपनीत असलेल्या कर्मचाऱ्यांची काय अवस्था असेल याबद्दल आपण विचारही करु शकणार नाहीत. भयानक दुर्घटना आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे घडला, नियमांचं पालन गेलं नव्हतं का? या सगळ्या गोष्टी आता तपासातून समोर येतील. पण या दुर्घटनेमुळे गेलेल्या नागरिकांचा प्राण परत कधीच येणार नाही.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.