मनसे म्हणते, राज ठाकरे भावी मुख्यमंत्री; जितेंद्र आव्हाड म्हणाले, मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान

यावेळी त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. त्यांना रात्रीच फार दिसते. त्यामुळे सत्तार रात्री बांधावर जात आहेत. आपण भाग्यवान आहोत की, आपल्याला असे कृषीमंत्री लाभले. अवघड आहे सगळं, असा टोलाही त्यांनी लगावला.

मनसे म्हणते, राज ठाकरे भावी मुख्यमंत्री; जितेंद्र आव्हाड म्हणाले, मग मी जनतेच्या मनातील पंतप्रधान
jitendra awhadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 3:16 PM

ठाणे : मनसेचा आज शिवाजी पार्कात मोठा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मनसेने जय्यत तयारीही केली आहे. या मोर्चाला हजारो लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मोर्चाची वातावरण निर्मिती म्हणून शिवाजी पार्क परिसरात बॅनर्स आणि मोठमोठे कटआऊट्सही लावले आहेत. यातील काही कटआऊट्सवर तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… राज ठाकरे, असं लिहिलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ते बोलत होते.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री अयोध्येला जात असतील तर चांगलं आहे. त्यांनी अयोध्येला गेलं पाहिजे. कारण त्यांना रामचं वाचवेल. त्यामुळे ते जात असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

तात्पुरता पदभार देऊ शकतो का?

महेश आहेर यांच्याकडे सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार सोपवला गेला. मूळत: ते आहेत उपकार्यालयीन अधिक्षक. प्रशासनातील कुठल्या महाभागाने ही फाईल फुटअप केली की, उप कार्यालयीन अधिक्षक हा थेट सहाय्यक आयुक्ताचा कार्यभार सांभाळतो आणि तो देखिल 5 वर्षे. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर हे तरुण आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्विस रुल्स चे पुस्तक त्यांनी वाचले असेल. कुठल्या सर्विस रुल्सच्या कायद्यामध्ये बसतं की, आपण एखाद्याला तात्पुरता पदभार किती वर्षे देऊ शकतो? याबाबत काही नियम आहेत की, सगळेच नियम ठाणे महानगरपालिकेने धाब्यावर बसवले आहेत, असा सवाल त्यांनी केला.

त्यांना मूळ अधिकार पदावर आणा

अगोदर महेश आहेर यांना मूळ अधिकार पदावर आणा. त्यांना उप कार्यालयीन अधिक्षक करा. त्यानंतर आपण बाकीचे सगळं बोलूया. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेवढे तरी करावं. पैशाने हात बरबटल्यामुळे महापालिकेचे खालचे अधिकारी काहीच करायला तयार नाहीत. आहेर यांचा पदभार काढला नाही. त्यांना तात्पुरता पदभार दिला याचं दु:ख वाटतं. त्याला 5 वर्ष त्याच पदावर ठेवल्या गेले. त्यावर आयुक्तांचे लक्ष नव्हते ? आता तो वरिष्ठांकडे बोट दाखवून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले.

मनाला येईल त्याला घरे दिली

मनाला येईल त्यांना घरे त्यांनी दिली आहेत. क्राइटेरीयात बसत नाही त्यांना घरे दिली. ठाणे महापालीका काही कोणाची सपंत्ती नाही. लोकांच्या खिशातू आलेला पैसा योग्यरित्या वापरला जावा. माझा आयुक्तांना प्रश्न आहे की त्यांना कळाले नाही की हा काय करतो ते? आता सभागृहात मुद्दा मांडला. अजूनही कारवाई होत नाही. अवघड आहे, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.