AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Traffic Police Fine : वाहतूक पोलिसांचा अजब कारभार, रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड

मुंबईच्या कांदिवली भागात 3 डिसेंबर रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता. त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याचे हे चलन असल्याचे समोर आले आहे. मात्र आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाईन प्रणालीच्या ई-चलानद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे.

Traffic Police Fine : वाहतूक पोलिसांचा अजब कारभार, रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड
वाहतूक पोलिसांचा अजब कारभार, रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 7:42 PM
Share

कल्याण : वाहतूक पोलिसां (Traffic Police)ची ऑनलाइन दंड (Penalty) आकारणी प्रणाली अनेकदा काहींना डोकेदुखी ठरत असते. त्याचे ताजं उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे. कल्याण पूर्व मलंग रोड द्वारली गावात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षा चालकाला ऑनलाईन चलान आले. त्याने अॅपवर तपासून पाहिले असता चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी 500 रुपयांचा दंड आकाराला आहे. या सगळया प्रकरणामुळे गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे. आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालकाने केली आहे. (In Kalyan, the rickshaw driver was fined by the traffic police for not wearing a helmet)

दुचाकी चालकाचा दंड रिक्षा चालकाला आकारला

मुंबईच्या कांदिवली भागात 3 डिसेंबर रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता. त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याचे हे चलन असल्याचे समोर आले आहे. मात्र आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाईन प्रणालीच्या ई-चलानद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे. सुरुवातीला मोबाईलवर या दंडासंबंधी माहिती आल्यानंतर रिक्षा चालक गुरुनाथला धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र माझी चूक नसताना मी ठाणे येथे का जावे? वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी अशी मागणी गुरुनाथने केली आहे.

वाहतूक पोलिसांनी आपल्या ई चलन पध्दतीत काम करताना निदान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यालाच दंड आकारला जातो आहे का? याची माहिती नीट तपासून संबंधितांच्या मोबाईलवर दंड पाठवावा, अन्यथा अनेकांना या ई चलन प्रणालीचा नाहक त्रास होणार असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी दिली आहे. (In Kalyan, the rickshaw driver was fined by the traffic police for not wearing a helmet)

इतर बातम्या

Video | जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत निवडणुका नाही; मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

राज्य सरकारचं कोर्टात ‘त त प प’! हा तर ओबीसींना धोका द्यायचा कार्यक्रम, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.