AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये आठ तासांपासून बिबट्याला पकडण्याचा थरार, वन विभाग अजूनही अयशस्वी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीत राहणारे राजू पांडे हे सकाळी साडेआठ वाजता आपल्या सहा दिवसांच्या बाळाला ऊन दाखवण्यासाठी इमारतीच्या खाली आले. यावेळी बिबट्यानेही त्यांच्यावर हल्ला केला.

कल्याणमध्ये आठ तासांपासून बिबट्याला पकडण्याचा थरार, वन विभाग अजूनही अयशस्वी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
| Edited By: | Updated on: Nov 24, 2022 | 6:42 PM
Share

कल्याण (ठाणे) : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका इमारतीत बिबट्या शिरल्याची बातमी समोर आलीय. बिबट्याने सकाळीच श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीत शिरताना तीन जणांवर हल्ला केला. त्यानंतर तो इमारतीत शिरला. सुरुवातीला तो इमारतीच्या पार्किंगमध्ये होता. त्यानंतर तो थेट इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर पोहोचल्याची बातमी समोर आली. बिबट्याचा इमारतीच्या पहिल्या माळ्यावरचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडीओत बिबट्या स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालेला दिसतोय. या बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ तासांपासून पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरुय. पण बिबट्या काही हाती लागत नाहीय.

दुसरीकडे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी परिसरात तुफान गर्दी केलीय. त्यामुळे पोलिसांनी बिबट्याला शोधायचं की गर्दीला आवरायचं? हा प्रश्न निर्माण झालाय. पोलीस आपल्यापरिने बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काटेमानवली नाक्याहून चिंचपाड्याकडे जाणारा रस्ता सध्या पोलिसांनी बंद केलाय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या केडीएमसी प्रशासन आणि वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी इमारतीला लॉक लाऊन तात्पुरते अडकवले आहे.

श्रीराम अनुग्रह टॉवर या इमारतीत राहणारे राजू पांडे हे सकाळी साडेआठ वाजता आपल्या सहा दिवसांच्या बाळाला ऊन दाखवण्यासाठी इमारतीच्या खाली आले. यावेळी बिबट्यानेही त्यांच्यावर हल्ला केला.

एका हाताने अधू असलेल्या राजू पांडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलाला आपल्या छातीशी लपून ठेवले आणि मुलाचे जीव वाचवले. बिबट्याने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि खांद्यावर हल्ला केला.

यावेळेस राजू पांडे यांचा भाऊ पाठीमागून जोरात बिबट्याच्या दिशेने धावत आला, लोकांची गर्दी बघत बिबट्याने बिल्डिंगमध्ये धाव घेतली.

बिबट्याच्या या हल्ल्यात राजू पांडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उल्हासनगरमधील शिवम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्यावर 40 टाके पडले आहेत. बाळ देखील सुखरूप असून ते त्याच्या आजी जवळ आहे.

दरम्यान, गेल्या आठ तासांपासून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न सुरु असले तरी प्रशासनाला त्यात यश आलेलं नाही. अखेर या ठिकाणी

विविध संघटना, वन विभागाच्या टीम एकत्र येऊन बिबट्याला पकडण्याची योजना आखत आहेत. इमारतीत फटाके फोडून लपलेल्या बिबट्याचा शोध सुरूय. संजय गांधी नॅशनल पार्क रेस्क्यू टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....