AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : निसर्गाचा आनंद घ्यायचा की निसर्ग जाळून टाकायचा याचा विचार तरुणांनी करावा : राजू पाटील

डोंबिवलीजवळ असलेली उंबरली टेकडी ही ऑक्सिजन झोन म्हणून ओळखली जाते. या टेकडीवर पर्यावरण प्रेमी वन विभागाच्या वतीने हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमी या वृक्षांची देखभाल देखील करत असतात. मॉर्निग वॉकसाठी या टेकडीवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या टेकडीवर आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

Raju Patil : निसर्गाचा आनंद घ्यायचा की निसर्ग जाळून टाकायचा याचा विचार तरुणांनी करावा : राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 6:34 PM
Share

डोंबिवली : निसर्गाचा आनंद घ्यायचा की निसर्ग जाळून टाकायचा हे तरुणाईला समजायला पाहिजे असे वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केलं आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास उंबरली टेकडीला आग (Fire) लागली. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी आग लागलेल्या भागाची आज पाहणी (Inspect) केली. यावेळी त्यांनी तरुणांना आवाहन केलं. संबंधित संस्था, वनविभाग यांची बैठक घेत टेकडीला संरक्षक भिंत बांधण्यावर भर दिला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितलं. डोंगरावर पार्टीसाठी येणाऱ्या काही मंडळींकडून हे कृत्य केले जात असल्याचा संशय नेहमीच व्यक्त होतो. मात्र प्रत्यक्षात अद्याप काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. या टेकडीला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली जात आहे. काल सायंकाळच्या सुमारास उंबरली टेकडीवर पुन्हा वणवा पेटला. (MNS MLA Raju Patil inspected the Umbarli hill near Dombivali after the fire broke out)

उंबरली टेकडी ही ऑक्सिजन झोन

डोंबिवलीजवळ असलेली उंबरली टेकडी ही ऑक्सिजन झोन म्हणून ओळखली जाते. या टेकडीवर पर्यावरण प्रेमी वन विभागाच्या वतीने हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमी या वृक्षांची देखभाल देखील करत असतात. मॉर्निग वॉकसाठी या टेकडीवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या टेकडीवर आग लागण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास डोंबिवली येथील उंबरली टेकडीवर वणवा भडकला. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केल्याने आगीत वृक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

टेकडीला संरक्षक भिंत बांधण्यावर भर दिला जाणार : राजू पाटील

आज मनसे आमदार राजू पाटील यांनी या टेकडीवरील आग लागलेल्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांनी या टेकडीवर वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. काल रात्री पुन्हा आग लागली. मला ग्रामस्थांनी याबाबत कळवलं त्यानंतर अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. सुदैवाने तासाभरात आग विझवण्यात आली. मात्र वारंवार आग का लागतेय ? या ठिकाणी वन विभागाचे दुर्लक्ष होतंय का असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. या ठिकाणी काही तरुण येतात, पार्ट्या करतात ,अशा तरुणांवर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ग्रामस्थ तसेच आमच्या परीने आम्ही लक्ष ठेवतो मात्र त्यांना अटकाव केला पाहिजे. निसर्गाचा आनंद घ्यायचा की निसर्ग जाळून टाकायचा हे तरुणाईला समजायला पाहिजे. या टेकडीचे संवर्धन कसे होईल याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या टेकडीवर बॉटनिकल गार्डनसाठी डीपीआर बनवण्याचे काम सुरू आहे. या टेकडीला संरक्षण भिंत घालणं हे गरजेचे आहे. यातील काही भाग संवर्धनासाठी संस्थांना दिला आहे. संबंधित संस्था, वनविभाग यांची बैठक घेत टेकडीला संरक्षक भिंत बांधण्यावर भर दिला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितलं. (MNS MLA Raju Patil inspected the Umbarli hill near Dombivali after the fire broke out)

इतर बातम्या

मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक, असं असेल आज लोकलचं वेळापत्रक

कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर, राज्य सरकार आर्थिक भार उचलणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.