AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron : ओमिक्रॉनची धास्ती! ठाण्यात नवीन निर्बंध लागू, काय आहे नवी नियमावली? वाचा सविस्तर

महानगरपालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Omicron : ओमिक्रॉनची धास्ती! ठाण्यात नवीन निर्बंध लागू, काय आहे नवी नियमावली? वाचा सविस्तर
ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 4:03 PM
Share

ठाणे : ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले असून, ठाणेकरांनी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. दरम्यान महानगरपालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग वाढला

अमेरीका आमि अन्य युरोपीय देशात मागील काही दिवसात ओमिक्रॉन कोरोना विषाणूचा प्रसार जलद गतीने होत असल्याचे निर्देशनास येत आहे.महाराष्ट्र राज्यात यापूर्वीच ओमिक्रोन कोरोना विषाणूच्या 88 रुग्णांची नोंद झालेली आहे. तसेच मागील आठवड्यात कोविडच्या च्या एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद प्रत्येक दिवशी राज्यात होत असल्याचे निर्देशनास येत आहे. त्यादृष्टीने प्रतीबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करुन नाताळ, लग्न समारंभ अन्य सण समारंभ व नव वर्षाचे स्वागत समारंभ याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात देखील निर्बंध घालण्यात येत आहेत. अशा सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

सण साजरा करताना नियमांचे पालन करा

यामध्ये नाताळ सण साजरा करताना गृह विभागाने दिलेल्या नियमांचे तंतोतंन पालन करणे, विवाह सोहळ्यांना कोणत्याही प्रकाराच्या बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळी 100 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच , खुल्या मैदानात 250 लोक किंवा क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीची अट राहणार आहे. इतर सामाजिक , राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यात बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळी 100 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. तसेच , खुल्या मैदानात 250 लोक किंवा क्षमतेच्या 25 टक्के लोकांना उपस्थित राहता येणार आहे. या व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांच्या बाबतीत बंदीस्त सभागृहात क्षमतेच्या 50 % तर खुल्या मैदानात 25 टक्केच परवानगी राहणार आहे.

अशी असेल नवी नियमावली

क्रिडा स्पर्धासाठी क्षमतेच्या 25 टक्केच प्रेक्षकांना उपस्थित राहणेची परवानगी राहणार आहे. इतर कोणत्याही संमेलनासाठी, मेळाव्यासाठी 250 लोक किंवा क्षमतेच्या 25 टक्के लोकांना उपस्थित राहता येणार आहे. उपहार गृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामशाळा यामध्ये सध्या लागू असलेली आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीची अट यापूढेही कायम रहाणार आहे. उपहार गृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शीत करणे बंधकारक असणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Income Tax Raid: कोणत्या संपत्तीवर होऊ शकते कारवाई? कुणावर पडते धाड? आयटी छापेमारीविषयी वाचा सविस्तर

Nagpur Corona | भीती कोरोनाची, आरोग्य सुविधांचा अभाव; मनपाने नेमके काय केले?

VIDEO : खाद्य पळवणाऱ्या रानडुकराला गेंड्यानं घडवली अद्दल, बाकीचे गेले पळून!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.