Ganesh Utsav : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी महापालिकेची एक खिडकी सुविधा

शासनाने 2022 च्या गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप परवानगी शुल्क व अनामत रक्कम न घेण्याबाबत निर्णय घेतल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले.

Ganesh Utsav : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी महापालिकेची एक खिडकी सुविधा
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 11:22 PM

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत गणेशोत्सवा (Ganeshotsav)साठी तात्पुरत्या स्वरुपात एक खिडकी योजना (One window Scheme) सुरु केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज उपलब्ध करण्यासोबतच मंडळांना संबंधित प्रभाग समिती क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्र येथील एक खिडकी योजनेद्वारे देखील अर्ज (Application) सादर करता येणार आहेत. या दोन्ही पध्दतीने सादर केलेल्या अर्जांची छाननी केल्यावर संबंधित प्रभाग समितीकडून परवानगी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज दिली. तसेच ठाणेकरांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून उत्साहात साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

शासनाने 2022 च्या गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप परवानगी शुल्क व अनामत रक्कम न घेण्याबाबत निर्णय घेतल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले.

एक खिडकी योजना काय आहे ?

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रभाग समिती क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्र येथील एक खिडकी योजनेद्वारे देखील अर्ज सादर करता येतील. यामध्ये वाहतूक पोलीस व पोलीस प्रशासन यांच्या प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व संबंधित प्रभाग समितीकडून परवानगी प्रदान करण्यात येणार आहे. महावितरणनेही यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.

हे सुद्धा वाचा

ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधा सदर सुविधा tmc.infosoftech.co.in/ Mandaponline.html या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन सुविधेमध्ये मंडप परवानगीसाठी पोलीस विभाग, वाहतूक पोलीस विभाग व अग्निशमन विभाग यांचा ना हरकत दाखला ऑनलाईन पध्दतीने api.infosoftech.co.in/#/login या लिंकवर ऑटो जनरेट पध्दतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महापालिकेचे नियम पाळणे बंधनकारक

महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्‍या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. अन्यथा परवानगी नाही असे गृहित धरुन महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान उत्सव किंवा कार्यक्रमास, मंडप, स्टेज व कमानी उभारण्‍याकरीता महापालिकेने सविस्तर कार्यपध्‍दती निश्चित केली असून ती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र.173/2010 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन सर्व उत्सव मंडळांनी करणे बंधनकारक असणार आहे. (One window facility of Municipal Corporation for permission of Public Ganeshotsav)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.