AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमधील ‘त्या’ वादग्रस्त देखाव्याला हिरवा कंदील, न्यायालयाकडून सशर्त परवानगी

महात्मा फुले पोलिसांनी देखाव्यात असलेले आक्षेपार्ह दृश्य आणि ध्वनीचित्रफितीमधील आक्षेपार्ह संवाद काढून टाकत हा देखावा सादर करण्याची परवानगी मंडळाला दिली आहे.

कल्याणमधील 'त्या' वादग्रस्त देखाव्याला हिरवा कंदील, न्यायालयाकडून सशर्त परवानगी
कल्याणमधील 'त्या' वादग्रस्त देखाव्याला हिरवा कंदीलImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 02, 2022 | 9:34 PM
Share

कल्याण : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात राजकीय दहिकाला सुरू आहे. दहीहंडीत देखील गटतट दिसून आले. आता ऐन गणेशोत्सवात देखील कल्याणात राजकीय वातावरण तापलंय. कल्याणमधील एका गणेशोत्सव मंडळानं एक देखावा (Appearance) उभारला. मी शिवसेना बोलतेय.. सेनेतल्या बंडावर हा देखावा होता. पोलिसांनी भल्या पहाटे या देखाव्याची सामुग्री जप् (Seized)त केली. मग काय वातावरण आणखी तापलं. प्रकरण कोर्टात गेलं. अखेर शिंदेंच्या राज्यात ठाकरे गटाला न्याय मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. न्यायालयाने या देखाव्याला सशर्त परवानगी (Permission) दिली.

पोलिसांनी देखाव्याचे साहित्य केले जप्त

कल्याणातील विजय तरूण मित्र मंडळाने राजकीय घडामोडीवर आधारित एक देखावा उभारला होता. या मंडळाचे विश्वस्त हे विजय साळवी आहे. साळवी हे सेनेचे कल्याण डोंबिवली शहराचे महानगर प्रमुख असून ते ठाकरे गटात आहेत. शिवसेनेतील बंडखोरी पक्षनिष्ठ यावर चलचित्र देखावा साकारला होता. पोलिसांनी आक्षेप घेत 31 ऑगस्टला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईचे पडसाद सर्वत्र उमटले. ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला.

आक्षेपार्ह संवाद काढून टाकत देखावा सादर करण्यास परवानगी

इतकंच नाही तर राज्य सरकारचा दबाव असल्याची टीका झाली. प्रकरण कोर्टात गेलं. त्यावर आज सुनावणी झाली. देखावा सादरीकरणास पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. यानंतर महात्मा फुले पोलिसांनी देखाव्यात असलेले आक्षेपार्ह दृश्य आणि ध्वनीचित्रफितीमधील आक्षेपार्ह संवाद काढून टाकत हा देखावा सादर करण्याची परवानगी मंडळाला दिली आहे.

पोलिसांनी हा देखावा जप्त केला तेव्हा कारवाईला विरोध करत मंडळाने मूर्तीची स्थापना न करता तसेच यापुढे उत्सव साजरा न करण्याची प्रतिज्ञा करत याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात आज सुनावणी झाली. सुनावणीसाठी अप्पर पोलीस, उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्यायालयात हजर होते.

देखाव्याबाबत ठाकरे गटाला न्यायालयाकडून दिलासा

या सुनावणीत न्यायालयाने मंडळाला देखावा सादर करण्याची सशर्त परवानगी देण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. यानंतर पोलिसांनी विजय मित्र मंडळाला देखाव्यातील आक्षेपार्ह दृश्य तसेच ऑडिओ क्लिपमधील आक्षेपार्ह संवाद काढून टाकण्याच्या अटीवर देखावा सादर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं? हा वाद कोर्टात प्रलंबित असला तरी देखाव्यावरून सुरु असलेल्या वादात ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. (Police give conditional permission to controversial appearance of Ganesh Mandal in Kalyan)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.