कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजप आमने सामने

कल्याणमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याच्या श्रेयावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. (shiv sena taking credit ambedkar memorial in kalyan, says ganpat gaikwad)

कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजप आमने सामने
shrikant shinde
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 3:26 PM

कल्याण: कल्याणमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्याच्या श्रेयावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात हा श्रेयवाद पेटला आहे. त्यामुळे सध्या कल्याणच्या राजकीय वर्तुळात आंबेडकर स्मारकाचे राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण पूर्वेला आंबेडकर स्मारक करण्याची मागणी होत होती. महापालिकेच्या ड प्रभाग समितीच्या नजीक असलेल्या उद्यानाची 8000 चौरस मीटर जागा आहे. त्याच जागेत 1300 चौरस मीटर जागेत आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी होत होती. मात्र या जागेवर आरक्षण असल्याने स्मारक उभे कसे राहणार असा प्रश्न होता. हे आरक्षण बदलण्यात आले असून त्यासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. स्मारकाच्या कामाचा डीपीआर तयार करुन लवकर निविदा काढली जाईल. स्मारकाचे काम लवकर सुरु केले जाईल. आरक्षण बदल आणि निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे स्मारक उभे राहत असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. आज स्मारक समितीच्या वतीने स्मारकाच्या जागेच्या ठिकाणी शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड, रमेश जाधव, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे भारत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पाच कोटींची निधी मंजूर केला

अभ्यासपूर्ण पाठपुरावा करुन स्मारकासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करुन दिली. तसेच पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापुढे स्मारकामासाठी आणखीन निधी लागल्यास तोही दिली जाईल, असा दावा शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केला आहे. तर या स्मारकासाठी राज्य सरकारकडून जी काही परवानगी हवी होती. ती मी आणून दिली. सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता फक्त निवडणूका जवळ आल्याने दलित समाजाला खूष करण्यासाठी शिवसेना श्रेय लाटत असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. स्मारकाचे श्रेय घेण्याऐवजी समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, या मागणीचा पुनरुच्चारही आमदार गायकवाड यांनी केला.

समृद्धी महामार्गाला आंबेडकरांचे नाव द्या

स्मारकासाठी आवश्यक असलेली परवानगी मी राज्य सरकारकडून प्राप्त करुन घेतली आहे. त्यासाठी एक समितीही तयार केली आहे. स्मारक होईपर्यंत त्याठीकाणी आंबेडकरांचा एक फायरबरचा पुतळाही बसविला होता. स्मारकाचा पाठपुरवा करत असताना स्मारकाच्या कामात शिवसेनेने अडथळे आणले. आता निवडणूका जवळ आल्याने दलित समाजाला खूष करण्यासाठी स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. समृद्धी महामार्गास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी यापूर्वीच मी सरकारकडे केली आहे. ही मागणी सरकारने मान्य करावी. तरच दलित समाज तुमच्या पाठिशी उभा राहील, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

अनिल परब शुद्धीत नव्हते, ईडीला काय कबुली जबाब दिला हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे काय?; किरीट सोमय्यांचा सवाल

घ्या.. सोशल मीडियावरचं प्रेम.. प्रियकराला भेटायला नागपूरहून आली, औरंगाबादेत येताच कळलं, पदवीधर ती अन् पाचवी पास ट्रकचालकाची आधीच दोन लग्न झाली

सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पनवेलची महिला कॉन्स्टेबल गजाआड, वरिष्ठाच्या हत्येचा शिजणारा कटही उघड

(shiv sena taking credit ambedkar memorial in kalyan, says ganpat gaikwad)

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.