AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Swine Flu : स्वाईन फ्लूची चाचणी महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर विनामूल्य होणार, ठाणे महापालिका आयुक्तांची घोषणा

जुलैमधील पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. महिनाभरात स्वाईन फ्लूचे 20 रुग्ण आढळले. त्यापैकी 15 जण बरे झाले आहेत. तर 2 जणांचे निधन झाले.

Thane Swine Flu : स्वाईन फ्लूची चाचणी महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर विनामूल्य होणार, ठाणे महापालिका आयुक्तांची घोषणा
स्वाईन फ्लूची चाचणी महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर विनामूल्य होणारImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 11:43 PM
Share

ठाणे : मंकी पॉक्स पाठोपाठ आता स्वाईन फ्ल्यू (Swine Flu) ने डोके वर काढले असून यामुळे प्रशासनाची चिंता आता वाढली आहे. दररोज स्वाईन फ्ल्यू च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यात ठाण्यात सोमवारी स्वाईन फ्ल्यू मुळे एकाच दिवशी दोन महिलांचा मृ्त्यू झाल्याने महापालिकेसह राज्याच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट (Alert) झाले असून स्वाईन फ्ल्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने स्वाईन फ्लू ची चाचणी (Test) महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर विनामूल्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचणीसाठी संबंधित डॉक्टरांची लेखी शिफारस लागेल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

ठाण्यात महिनाभरात स्वाईन फ्ल्यू चे 20 रुग्ण

जुलैमधील पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. महिनाभरात स्वाईन फ्लूचे 20 रुग्ण आढळले. त्यापैकी 15 जण बरे झाले आहेत. तर 2 जणांचे निधन झाले. आतापर्यंत रुग्ण सापडलेल्या परिसरातील हजारो घरांचे सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. त्यात नवीन रुग्ण आढलेले नाहीत. स्वाईन फ्ल्यू सोबतच डेंग्यूचे रुग्णही वाढत आहेत.

स्वाईन फ्ल्यू ची लक्षणे आणि काळजी

ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, भूक मंदावणे, डोके दुखणे ही स्वाईन फ्लू ची लक्षणे आहे. नागरिकांना ही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, कोविड काळाप्रमाणेच मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे ही पथ्ये पाळावीत, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. (Swine flu test will be free at all health centers of the thane municipality)

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.