Thane: महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत 119 किलो प्लास्टिक जप्त, तर 19 हजार 900 रुपये दंड वसूल

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सुमारे 119 किलो प्लास्टिक जप्त करून 19 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Thane: महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत 119 किलो प्लास्टिक जप्त, तर 19 हजार 900 रुपये दंड वसूल
बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करताना महापालिकेचे पथक.
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 7:02 PM

ठाणे : प्लास्टीक बंदी (Plastic Ban) संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका (Municipal Corporation)  क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक,(Plastic) थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सुमारे 119 किलो प्लास्टिक जप्त करून 19 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण ) कायदा 2006 अंतर्गत महाराष्ट्र शासनद्वारे प्लास्टीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंचे ( उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी साठवणुक ) वर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे.

अचानक धाडी टाकून प्लास्टीक वापरणाऱ्यावर दंड

सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण 119 किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून 19 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

सदरची कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी व आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या 9 प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारी आदींनी केली.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.