
TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाण्यात शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर होतं. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.
प्रभाग क्रमांक 13 बाबत बोलायचं झाल्यास गेल्यावेळी या प्रभागामधून चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. इंदिरा नगर, हनुमान नगर, लोकमान्य नगर, पाचपाखडी म्हाडा कॉलनीचा भाग, येऊर गावच्या सीमेपासून रायफल रेंजपर्यंत या प्रभागाची व्याप्ती राहणार आहे. प्रभाग क्रमांक 13 ची एकूण लोकसंख्या 57526 इतकी आहे. त्यापैकी 3085 एवढी अनुसूचित जातीची तर 649 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक तेरा अ मधून शिवसेनेचे अशोक वैती विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 13 ब मधून निर्मला कानसे या विजयी झाल्या होत्या. क मधून प्रभा बोरिटकर यांनी बाजी मारली होती. तर ड मधून संतोष वडावळे हे विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 13 (अ) | ||
| 13 (ब) | ||
| 13 (क) | ||
| 13 (ड) |
गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 14 मधून चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. या प्रभागामध्ये मुंब्रा भागातील काही प्रमुख वस्ती आणि परिसर येतात, ज्यामध्ये मुंब्रा स्टेशन परिसर, कौसा, डायघर आणि आजूबाजूच्या वस्त्यांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 14 ची एकूण लोकसंख्या 58466 इतकी आहे. त्यापैकी 3918 एवढी अनुसूचित जातीची तर 780 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक चौदा अ मधून शिवसेनेचे पूर्वेश सरनाईक विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 14 ब मधून आशा डोंगरे या विजयी झाल्या होत्या. क मधून कांचन चिंदरकर यांनी बाजी मारली होती. तर ड मधून दिलीप बारटक्के हे विजयी झाले होते.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 14 (अ) | ||
| 14 (ब) | ||
| 14 (क) | ||
| 14 (ड) |
प्रभाग क्रमांक 15 मधून गेल्या वेळी तीन जागांवर भाजपने आणि एका जागेवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक 15 ची एकूण लोकसंख्या 61186 इतकी आहे. त्यापैकी 6379 एवढी अनुसूचित जातीची तर 1142 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 15 (अ) | ||
| 15 (ब) | ||
| 15 (क) | ||
| 15 (ड) |
2017 मध्ये या प्रभागात तीन जागांवर भाजपने आणि एका जागेवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून भाजपच्या सुवर्णा कांबळे विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 15 ब मधून शिवसेनेचे एकनाथ भोईल विजयी ठरले होते. क मधून भाजपच्या केवलादेवी यादव यांनी बाजी मारली होती. तर ड मधून भाजपचेच विलास कांबळे विजयी झाले होते.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE