Thane Accident : खोणी तळोजा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

Thane Accident : खोणी तळोजा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू
खोणी तळोजा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक

ट्रकवरील चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक अनियंत्रित झाला. यामुळे पुढे चाललेल्या दुचाकीला ट्रकने धडक मारली. या धडकेत दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक सोडून पळून गेला.

निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 17, 2022 | 6:58 PM

ठाणे : डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरून तळोजाला जाणाऱ्या खोणी तळोजा महामार्गावर एका ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीला धडक दिली. रविंद्र ठाकरे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघाताची महिती मिळताच उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकच्या क्लिनरला ताब्यात घेतले.

अपघातानंतर ट्रक चालक फरार

खोणी तळोजा महामार्गावर आज दुपारच्या सुमारास गुजरात पासिंगचा एक ट्रक चालला होता. ट्रकवरील चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक अनियंत्रित झाला. यामुळे पुढे चाललेल्या दुचाकीला ट्रकने धडक मारली. या धडकेत दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक सोडून पळून गेला. मयत दुचाकी चालक रविंद्र ठाकरे हे याच परिसरातील पाली गावात राहणारे असल्याने अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करीत तोडफोड केली.

दरम्यान याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार उल्हासनगर हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी रविंद्र ठाकरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाल्याने पोलिसांनी ट्रकच्या क्लिनरला ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.

भोकरचे दोन तरुण बीडमध्ये ठार, एक गंभीर

दरम्यान बीड जिल्ह्यातील तेलगांवजवळही आज सकाळी अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात नांदेडच्या दोन युवकांचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे. हे तिघेही नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरातील शहीद प्रफुल गोवंदे नगर इथले रहिवासी आहेत. भोकरहून बीड मार्गे हे तरुण शिर्डी इथे साई दर्शनासाठी जात होते. या दरम्यान त्यांची भरधाव कार झाडाला धडकल्याने हा अपघात झालाय. दरम्यान, या दुर्घटनेनंतर भोकर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. (Truck hits two-wheeler on Khoni Taloja highway, Two-wheeler driver dies on the spot)

इतर बातम्या

Video | कशाला हवी मोठी गाडी? मुंब्य्रातली पोरं म्हणतात, आमची अ‍ॅक्टिवाच भारी! आता घडणार जेलवारी?

Pimpri Chinchwad crime| कुठला डॉन? आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील302 म्हणत अल्पवयीन तरुणीची सोशल मीडियावर गुंडगिरी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें