न्याय व्यवस्था ही आदर्श असायला हवी, ती ईडीच्या हातात जायला नको – शरद पवार
संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदी अनुवाद लवकर यावेत अशी मागणी केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशन आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात झाले. लोकशाहीचा अभ्यास करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे आणि लोकप्रतिनिधींना या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकातून शिकायला मिळेल की सत्तेचा गैरवापर कसा केला जातो आणि त्याविरोधात लढायचे कसे याचा उत्तम पाठ यात आहे असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
ते तत्पूर्वी आपल्या भाषणात पवार म्हणाले की लक्षात राहणारा असा आजचा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांनी १०० दिवस तुरुंगात घालवले. तिथले सर्व अनुभव लिखित स्वरुपात आपल्यासमोर मांडले. कुणी गुन्हा केला असेल, केस झाली असेल, निकाल लागला असेल असं संकट काही लोकांवर येत असतं. पण संजय राऊत यांनी काय केलं होतं? संजय राऊत नियमित रोखठोक भूमिका मांडली. हे काही लोकांना मान्य नव्हतं. त्यांची ही लेखणी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते. बहुतेक संधीची वाटच पाहत होते. त्यांना संधी दिली पत्राचाळ प्रकरणाने दिली. पत्राचाळीत कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे. ईडीने जी केस केली. त्यात राऊता यांचा काहीही संबंध नसताना त्यांना गुंतवण्याचं काम केलं. जिथे अन्याय होतो, अत्याचार आहे, त्याच्या विरोधात सामना उभा राहतो.हे अखंडपणे काम सुरू होतं असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
शासकीय यंत्रणेत जिथे भ्रष्टाचार आहे. त्याविरोधात ते नेहमी लिहितात. मुंबई आणि महाराष्ट्रात काही लोक चुकीचं काम करतात हे माहीत असताना त्यांच्यासंबंधीची कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना याबाबतचं पत्र लिहिलं. जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचं सविस्तर लिखाण त्यांनी केंद्राला कळवलं. त्यात जवळपास ३० ते ३५ असे लोक आणि कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले. ही रक्कम ५८ कोटीच्या आसपास होती. ही माहिती राऊत यांच्याकडे आल्यावर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखीत स्वरुपात ती पाठवून दिली. पण, कारवाई झाली नाही असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत यांना १०० दिवस तुरुंगात राहावं लागलं. त्यांनी पुस्तक लिहिलं. हे वाचल्यावर तिथली स्थिती काय आहे हे आम्हाला कळेल. ही स्थिती दुरुस्त करण्याचा प्रयोग करावा लागेल. त्यांच्या जेलमधील आठवणी आणि अनेकांच्या भेटीगाठी हा लक्षात येणार आहे. एकनाथ खडसे आमचे सहकारी आहे. त्यांचे जावई इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्स्ल्टन्सीत मोठ्या पदावर होते. खडसेंवर कारवाई झाली. त्यांना त्रास होईल हे कळलं. तेव्हा सासऱ्यासाठी ते लंडनहून आले. त्यांचा संबंध नसताना ईडीने त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकलं असे पवार यावेळी म्हणाले.
न्याय व्यवस्था ही आदर्श असायला हवी
संजय राऊत यांच्या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद यावेत, लोकशाहीचा अभ्यास करणारे, लोकप्रतिनिधी यांतून माहीती मिळेल. सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचे बळ मिळेल, न्याय व्यवस्था ही आदर्श असायला हवी, ती ईडीच्या हातातील बटीक व्हायला नको याचा धडा यातून मिळेल असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
