Latur : शाळा सुरु होणार पण काय असणार नियमावली? राज्य सरकारच्या होकार नंतर जिल्हा प्रशासनाच्या हाती निर्णय

Latur : शाळा सुरु होणार पण काय असणार नियमावली? राज्य सरकारच्या होकार नंतर जिल्हा प्रशासनाच्या हाती निर्णय
लातूरचे पालकमंत्री, अमित देशमुख

केवळ मराठवाड्यातच नाही तर सबंध राज्यात शिक्षणाच्या दृष्टीने लातूरला वेगळे असे महत्व आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील खासगी क्लासेस अन् शाळा महाविद्यालये ही बंद होते. मात्र, पुन्हा सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय झाला असला तरी स्थानिक पातळीवरची स्थिती पाहून जिल्हा प्रशासनाला याबाबत निर्णय घेता येणार आहे.

महेंद्र जोंधळे

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 21, 2022 | 3:12 PM

लातूर : केवळ मराठवाड्यातच नाही तर सबंध (Maharashtra) राज्यात शिक्षणाच्या दृष्टीने लातूरला वेगळे असे महत्व आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील खासगी क्लासेस अन् (School-College) शाळा महाविद्यालये ही बंद होते. मात्र, पुन्हा सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय (State Government) राज्य सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय झाला असला तरी स्थानिक पातळीवरची स्थिती पाहून जिल्हा प्रशासनाला याबाबत निर्णय घेता येणार आहे. हे सर्व असले तरी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांची काळजी घेत शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करावी असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रशासन व संबंधित विभागांना दिले आहेत. जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता काय निर्णय घेतला जाणार हे देखील पहावे लागणार आहे.

रुग्णसंख्येत वाढ मात्र, लक्षणे सौम्य

लातूर जिल्ह्यात 1 जानेवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ सुरवात झाली होती. अद्यापही दिवसाकाठी 500 ते 600 नव्या रुग्णांची भर पडत आहे. असे असले तरी कोरोनाची लक्षणे ही सौम्य आहेत. अशा परस्थितीमध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य स्तरावरून घेण्यात आला आहे, प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊन तेथील प्रशासनाने याबाबत निर्णय असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात शाळा- कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाची जबाबदारी तर महत्वाची असून इतर विभागांचीही भूमिका महत्वाची राहणार आहे.

नेमकी कोणती खबरदारी घेतली जाणार

शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी सर्व वर्गखोल्या, शाळेचा परिसर येथील कार्यालये, स्वच्छ व निर्जंतुक करून घ्याव्या लागणार आहेत. शाळांमध्ये मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था अनिवार्य असणार आहे. शाळांमधून गरजेनुसार उपचारांच्या सुविधा उभाराव्या त्याचबरोबर जवळपासच्या रुग्णालयाची यासाठी मदत घ्यावी सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण संस्था चालक, गाव पातळीवर शिक्षण समित्या, शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जागृती निर्माण करून त्यांना योग्य ती काळजी घेण्यास सांगावे. अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत,

स्वतंत्र व्यवस्था गरजेची

शिक्षणसंस्थांमध्ये प्रत्यक्ष शैक्षणिक उपक्रम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी योग्य प्रकारची काळजी घेतली जाते की नाही याची देखरेख करणारी एखादी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. त्यामुळे गैरसोय टळली जाणार आहे. हे केवळ आरोग्य विभागाचे काम नसून याकरिता जिल्हा प्रशासनाला त्या परिसरातील नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Chandrapur | कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणीकडे मागावी?, ब्रम्हपुरीत पोलीस शिपायाचा विवाहितेवर अत्याचार

Rohit Patil : आरआर आबाच्या पोराची राजकारणात दमदार एन्ट्री, रोहित पाटलांबाबत कोण काय म्हणालं?; हे VIDEO पाहाच!

श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा; कोणत्या सोयीसुविधा मिळणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें