AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू; एक जखमी

नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे.

Nagpur : नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू; एक जखमी
| Updated on: Aug 04, 2022 | 8:17 AM
Share

नागपूर : विदर्भात पाऊस (Rain) सुरूच आहे. मान्सून (Monsoon Update) सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत अनेकांना पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक दुर्दैवी बातमी नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर जिल्ह्यातून समोर येत आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत अन्य एक जण जखमी झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत जीवती तालुक्यात शेडवाही शिवारात वीज कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस हद्दीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उज्वला थुटूरकर असे या महिलेचे नाव आहे. यंदा या दोनही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

भद्रावती तालुक्यातील शहरालगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळल्याने त्याचा जागीचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. संजय काशिनाथ चालखुरे वय 55 असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव  आहे तर वीज पडल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव विकास डाखरे वय 22 असे आहे. हे दोघेही चीचोर्डी शेत शिवारामध्ये गुरे चारत होते. याचवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यातच अंगावर वीज कोसळल्याने संजय चालखुरे यांचा मृत्यू झाला. तर विकास डाखरे हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अन्य घटनेत दोघांचा मृत्यू

दुसरीकडे जीवती तालुक्यात शेडवाही शिवारातही अशीच एक घटना घडली आहे.  वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर  नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस हद्दीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उज्वला थुटूरकर असे या महिलेचे नाव आहे. वीज पडून मृत्यू  झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. यंदा देखील पावसाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत अनेकांना वीजेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.