AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन महिन्यांनी दुकानाचं शटर उघडलं, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा फटाके फोडून आनंद साजरा

शासनाच्या निर्णयानंतर आजपासून पात दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले गेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीन महिन्यातून आज पहिल्यांदाच दुकानांचं शटर उघडलं. यावेळी व्यापाऱ्यांनी फटाके फोडूनआपला आनंद व्यक्त केला.

तीन महिन्यांनी दुकानाचं शटर उघडलं, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा फटाके फोडून आनंद साजरा
कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी तीन महिन्यातून आज पहिल्यांदाच दुकानांचं शटर उघडलं. यावेळी व्यापाऱ्यांनी फटाके फोडूनआपला आनंद व्यक्त केला
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 10:22 AM
Share

कोल्हापूरकोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी तब्बल तीन महिन्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कोरोना संसर्गामुळे मागील तीन महिन्यांपासून दुकाने बंद होती. शासनाच्या निर्णयानंतर आजपासून पात दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले गेले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तीन महिन्यातून आज पहिल्यांदाच दुकानांचं शटर उघडलं. यावेळी व्यापाऱ्यांनी फटाके फोडूनआपला आनंद व्यक्त केला. (Three months later Shop open in kolhapur merchants celebrated with fireCrackers)

शहरातील दुकाने उघडायला सुरुवात, व्यापाऱ्यांनी फटाके फोडले

अनेक दिवसांपासून व्यापारी निर्बंध हटवण्याची मागणी करत होते. अखेर व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आलंय. कोल्हापूर शहरातील सर्व दुकानं उघडायला राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आजपासून नऊ जुलै पर्यंत सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत उघडता येणार आहे. परवानगी मिळताच व्यापाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शहरातील महाद्वार रोड राजारामपुरी अशा मुख्य बाजारपेठेतील दुकाने उघडायला सुरुवात झाली आहे.

पाच दिवसानंतर पुन्हा आढावा घेतला जाणार

पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे, असं राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसंच गर्दीचे प्रकार घडल्यास पुन्हा निर्बंध कडक करण्याचा देखील इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय.

राज्य शासनाच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना दिलासा

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर शहरातील व्यापारी निर्बंधांमुळे अडचणीत सापडले होते. राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे त्यांना दुकानं बंद ठेवावी लागायची. मात्र आता शासनाच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांना दिलासा म्हणावा लागेल.

ग्रामीण भागात निर्बंध कायम

कोल्हापूर शहरातील जरी निर्बंध हटवले गेले असले तरी ग्रामीण भागात मात्र निर्बंध कायम आहेत. ग्रामीण भागातील निर्बंध हटण्यासाठी जनतेला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील काय म्हणाले?

कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला एक पत्र पाठवलं होतं. जनभावनेचा विचार करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसासाठी हटवले आहेत. शासनाने जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मात्र जनतेने देखील सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत, असं कोल्हापूर शहराचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

(Three months later Shop open in kolhapur merchants celebrated with fireCrackers)

हे ही वाचा :

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.