AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 19 ते 21 मधील विजयी उमेदवार कोण?

Thane Municipal Corporation TMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एकोणिस, वीस आणि एकवीसमधून कोणते उमेदवार विजयी ठरले, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 19 ते 21 मधील विजयी उमेदवार कोण?
thane municipal corporation Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:44 AM
Share

TMC Election Results 2026 LIVE : ठाणे महापालिकेत एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 असून यात पुरुष मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली झाली असून यंदाही त्याच जनगणनेनुसार निवडणूक होत आहे. 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाण्यात शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानावर होतं. यंदा मात्र चित्र वेगळं आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.

Ward No. 19

गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 19 मधील चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक 19 ची एकूण लोकसंख्या 51722 इतकी आहे. त्यापैकी 3795 एवढी अनुसूचित जातीची तर 675 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक एकोणिस अ मधून शिवसेनेच्या मीनल सांखे विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 19 ब मधून शिवसेनेच्या नम्रता फाटक या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेचे विकास रेपाळे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून शिवसेनेचे नरेश म्हस्के हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
19 (अ)
19 (ब)
19 (क)
19 (ड)

Ward No. 20

गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 20 मधील चारही जागांवर शिवसेनेनं बाजी मारली होती. या प्रभागामध्ये जुना ठाणे, मासुंदा तलाव परिसर, तारा बंगला, उमंगवाडी आणि ठाणे स्टेशनजवळील काही भाग यांचा समावेश होतो, जो मुख्यत्वे शहराच्या जुन्या आणि मध्यवर्ती भागातून जातो आणि यात निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रे आहेत. प्रभाग क्रमांक 20 ची एकूण लोकसंख्या 53490 इतकी आहे. त्यापैकी 4344 एवढी अनुसूचित जातीची तर 2572 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चारपैकी तीन जागांवर शिवसेनेनं आणि एका जागेवर भाजपने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक वीस अ मधून शिवसेनेच्या मालती पाटील विजयी झाल्या होत्या, तर प्रभाग क्रमांक 20 ब मधून शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर या विजयी झाल्या होत्या. क मधून शिवसेनेच्याच नम्रता पमनानी यांनी बाजी मारली होती. तर ड मधून भाजपचे भारत चव्हाण हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
20 (अ)
20 (ब)
20 (क)
20 (ड)

Ward No. 21

गेल्या वेळी प्रभाग क्रमांक 21 मधील चारही जागांवर भाजपने बाजी मारली होती. या प्रभागामध्ये प्रामुख्याने मजिवाडा-मानपाडा परिसरातील अनेक महत्त्वाच्या वस्ती आणि सोसायट्यांचा समावेश होतो. ज्यात अमरापाली, साई शिवाजी नगर, पाटलपाडा, रुतु इस्टेट, झेन गार्डन, पाम बीच, कापूरबावडी, मोजेझ कंपाउंड आणि घोडबंदर रोडवरील विविध सोसायट्या यांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 21 ची एकूण लोकसंख्या 50963 इतकी आहे. त्यापैकी 870 एवढी अनुसूचित जातीची तर 401 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

2017 मध्ये या प्रभागात चारपैकी चारही जागांवर भाजपने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक एकवीस अ मधून भाजपचे संजय वाघुले विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 21 ब मधून भाजपच्या प्रतिभा मढवी या विजयी झाल्या होत्या. क मधून भाजपच्याच मृणाल पेंडसे यांनी बाजी मारली होती. तर ड मधून भाजपचे सुनेश जोशी हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
21 (अ)
21 (ब)
21 (क)
21 (ड)

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

ठाणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.