सर्वाधिक उमेदवार पुण्यात, तुमच्या जिल्ह्यात एकूण किती उमेदवार?

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 246 उमेदवार निवडणुकीत (Maharashtra vidhansabha total candidates) आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असतील.

सर्वाधिक उमेदवार पुण्यात, तुमच्या जिल्ह्यात एकूण किती उमेदवार?
Follow us
| Updated on: Oct 07, 2019 | 10:48 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 288 मतदारसंघात 1504 उमेदवारांनी अर्ज (Maharashtra vidhansabha total candidates) माघारी घेतले. यानंतर आता एकूण 3239 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 246 उमेदवार निवडणुकीत (Maharashtra vidhansabha total candidates) आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

शनिवारी झालेल्या छाननीअंती 4743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1504 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार?

  • नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 26 उमेदवार
  • धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार
  • जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार
  • बुलडाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार
  • अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 68 उमेदवार
  • वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार
  • अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 109 उमेदवार
  • वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार
  • नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार
  • भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 42 उमेदवार
  • गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार
  • गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 38 उमेदवार
  • चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार
  • यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार
  • नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 135 उमेदवार
  • हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 33 उमेदवार
  • परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 53 उमेदवार
  • जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 79 उमेदवार
  • औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 128 उमेदवार
  • नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 148 उमेदवार
  • पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 53 उमेदवार
  • ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 214 उमेदवार
  • मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात 244 उमेदवार
  • मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 89 उमेदवार
  • रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 78 उमेदवार
  • पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 246 उमेदवार
  • अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 116 उमेदवार
  • बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 115 उमेदवार
  • लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 79 उमेदवार
  • उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 50 उमेदवार
  • सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार
  • सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 73 उमेदवार
  • रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 32 उमेदवार
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 23 उमेदवार
  • कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार
  • सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 68 उमेदवार

सर्वात कमी आणि सर्वात जास्त उमेदवार असलेले मतदारसंघ

सर्वात कमी 3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात आहेत, तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार आहेत.

नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयू) आवश्यकता असेल. तर कंट्रोल युनिट (सीयू) एकच लागणार आहे.

30 मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार

अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. राज्यात ईव्हीएमच्या सर्वोच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा उमेदवारांची संख्या कमी असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.