AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 23 May 2025 : मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार, निवडणूक आयोगाकडून निर्णय जाहीर

| Updated on: May 24, 2025 | 8:48 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 23 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 23 May 2025 : मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार, निवडणूक आयोगाकडून निर्णय जाहीर
live breaking

वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी अखेर 7 दिवसांनी तिचे सासरे राजेंद्र हगवणे,दीर सुशील हगवणेला पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती, नणंद, सासू यांना अटक झाली होती पण सासरे व दीर फरार होते. अखेर आज पहाटे स्वारगेट येथून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना लवकरच कोर्टासमोर हजर करण्यात येईल. त्या सर्वांवर मकोका लावावा आणि कठोर कारवाई करावी, तरच आमच्या गेलेल्या मुलीला न्याय मिळेल अशी भावना वैष्णवीच्या आई-वडिलांनी व्यक्त केलीय. दरम्यान आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे वैमानिकांच्या 43 व्या तुकडीचा पदवी प्रधान सोहळा नाशिकच्या गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन ट्रेडिंग स्कूल येथे पार पडणार आहे. चेतक, चित्ता अशा लढाऊ हेलिकॉप्टरचे चित्तथरारक प्रात्यक्षिक केली जातील. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 May 2025 07:26 PM (IST)

    पंढरपूरला मुसळधार पावसानं झोडपलं, भाविकांची तारांबळ

    पंढरपूर शहरात अतिमुसळधार पाऊस

    पंढरपूर शहराला अवकाळी पावसानं झोडपलं

    सलग पाच दिवसांपासून सुरू आहे पाऊस

    पावसामुळे भाविकांचे हाल

  • 23 May 2025 06:53 PM (IST)

    वाशिमला अवकाळी पावसानं झोडपलं, सलग 13 दिवसांपासून पाऊस

    वाशिमला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं

    जिल्ह्यात सलग तेरा दिवसांपासून अवकाळी पाऊस

    सततच्या पावसामुळे शेतीची मशागत, व पेरणीपूर्वीची कामे खोळंबली

    कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना काळजीपूर्वक शेती नियोजनाचा सल्ला

  • 23 May 2025 06:36 PM (IST)

    कणकवली -आचरा- मालवण राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

    कणकवली -आचरा- मालवण राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद

    जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे राज्य महामार्गाला फटका

    या मार्गावरील पर्यायी रस्ता गेला वाहून

    कणकवली- वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद

    या राज्य मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम आहे सुरू

  • 23 May 2025 06:00 PM (IST)

    मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार, निवडणूक आयोगाकडून निर्णय जाहीर

    निवडणूक आयोगाकडून 2 महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदानादिवशी व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने हे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रचारासाठीची मर्यादादेखील नव्याने निश्चित करण्यात आली आहे.

    निवडणूक आयोगाकडून 2 महत्त्वाचे निर्णय जाहीर

  • 23 May 2025 05:37 PM (IST)

    माझा न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास, वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया

    शिवाजीनगर कोर्टाने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे वैष्णवी मृत्यू प्रकरणात यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी या कोठडीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. “28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. मला वाटतेय जास्त मिळायला पाहिजे होती. त्यामुळे पोलिसांना अधिक तपास करता आला असता. यांचे अनेक गुन्हे उघड झाले असते. माझा न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे” असं वैष्णवीचे वडील म्हणाले.

  • 23 May 2025 05:13 PM (IST)

    राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

    मोठी बातमी समोर आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवी मृत्यू प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 23 May 2025 05:07 PM (IST)

    विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ड्रेस कोड लागू करा, वारकरी संप्रदायाची मागणी

    विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ड्रेस कोड लागू करावी,अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी मंदिर समितीला लेखी निवेदन देऊन ही मागणी केली आहे. मंदिर हे शांतीचे ठिकाण आहे तेथे येणाऱ्यांनी नम्रता,श्रद्धा आणि भक्ती भाव घेऊन यावे. मात्र सध्या अनेक भाविक फॅशनेबल कपड्यांमध्ये मंदिरात येतात. त्यामुळे मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणावर परिणाम होतो. त्यामुळे विठ्ठल मंदिरात लवकरात लवकर ड्रेस कोड लागू करण्यात यावा, अशी मागणी आहे. पारंपारिक पद्धतीने वेशभूषा केलेल्या भाविकांनाच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी प्रवेश द्यावा, अशी मागणीही ह भ प ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांची आहे. तसेच ड्रेस कोड लवकरात लवकर लागू न केल्यास वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरणार, असा इशाराही ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी दिला आहे.

  • 23 May 2025 03:54 PM (IST)

    संभाजी भिडेंना मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका – संभाजी ब्रिगेड

    मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला आहे. 6 जून ही तारीख ‘नामशेष’ करून टाका असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

  • 23 May 2025 03:29 PM (IST)

    पालघर ब्रेकिंग – पालघर मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

    पालघरच्या केळवा,मनोर, सफाळेमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

  • 23 May 2025 03:06 PM (IST)

    कोकेन सापडले त्या कंपनीची जागा रद्द करून ताब्यात घेऊ – उदय सामंत

    ज्या कंपनीच्या शेडमध्ये कोकेन सापडले त्या कंपनीची जागा रद्द करून ताब्यात घेऊ असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. कराड MIDC त 5 कोटींचे कोकेन जप्त झाले आहे त्या. घटनेवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • 23 May 2025 03:02 PM (IST)

    वैष्णवी हगवणे प्रकरणी जयंत पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण

    वैष्णवी हगवणे प्रकरणी जयंत पाटलांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे. “हगवणेंच्या घरी जे काही घडलं त्याला अजित पवार जबाबदार असू शकत नाही. घरातील घटनांवर नेत्यांचं नियंत्रण नसतं” असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांची बाजू मांडली आहे.

  • 23 May 2025 02:46 PM (IST)

    बीडमध्ये पवनचक्की प्लांटच्या परिसरात गोळीबार; एकाचा मृत्यू

    बीडमध्ये पवनचक्की प्लांटच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली. चोरीच्या प्रयत्नानंतर सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. बीडमधील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे.

  • 23 May 2025 02:27 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने हाती घेतलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट

    ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आता हाती घेतलं आहे.  यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला आहे. सरकारने नक्षलवाद्यांचे पूर्ण कंबरड मोडून काढलं आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हाती घेतलं आहे.संपूर्ण देशावा मोदींचा अभिमान वाटतोय.”

  • 23 May 2025 02:13 PM (IST)

    वैष्णवी हगवणे प्रकरण, निलेश चव्हाणनंही स्वत:च्या पत्नीचा छळ केल्याचं समोर

    वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा अन् दीराला अखेर बेड्या घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटेकनंतर दोन्ही आरोपींना बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. निलेश चव्हाणनंही स्वत:च्या पत्नीचा छळ केल्याचं समोर आलं आहे.

  • 23 May 2025 01:49 PM (IST)

    धक्कादायक! कराडमध्ये 6 कोटी रुपयांचे कोकेन पकडले

    कराड येथील तासवडे एमआयडीसीत 6 कोटी रुपयांचे कोकेन पकडले आहे. हे कोकेन सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीत सापडले आहे. हे कोकेन 1370 ग्रॅम वजनाचे आहे. कंपनीत बेकायदेशीर कोकेन लपवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीवर छापा टाकला. तपासानंतर पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई तळबीड पोलीसांनी केली आहे.

  • 23 May 2025 01:45 PM (IST)

    कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

    एकीकडे अवकाळी पावसाने अस्मानी तर दुसरीकडे कांद्याला निच्चांकी बाजार भाव मिळत असल्याने सुल्तानी संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे. येवला बाजार समितीत गोल्टी कांद्याला 135 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव आहे. म्हणजे 1 रुपया 35 पैसे किलो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

  • 23 May 2025 11:00 AM (IST)

    धुळे गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरण अपडेट

    महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती प्रकरणी गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये सापडलेल्या रकमे संदर्भात एडिशनल डायरेक्टर इनकम टैक्स ( तपास) ,नाशिक यांच्या कडे कैश संबंधित बाबी तपासण्याकरिता प्रशासनाने माहिती दिली. त्या नुसार पुढील कारवाही करण्यात येईल. मिळालेली एक कोटी 84 लाख 84 हजार दोनशे रुपयांची रक्कम ट्रेसरी मधे ठेवण्यात आली आहे. BNSS कायदा कलम 173(3)अन्वये चौकशी सुरू करण्यात आली आहे.

  • 23 May 2025 10:50 AM (IST)

    विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला

    ठाण्यात विजेच्या धक्क्याने १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. राजेश पवार मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. राजेश पवार सिग्नल खांब ला लागून असलेल्या शिडीवर खेळताना चढला असता विजेच्या धक्क्याने खाली कोसळला.

  • 23 May 2025 10:40 AM (IST)

    संजय राऊत यांचा सरकारवर घणाघात

    धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणात संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टिका केली. याप्रकरणी कैलास पाटील याचे निलंबन केले. पण गुन्हा का नोंदवला नाही. हे प्रकरण ईडीकडे का सोपवले नाही असा सवाल त्यांनी केला.

  • 23 May 2025 10:30 AM (IST)

    रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

    वैष्णवी हगवणे प्रकरणात आम्ही कलम पहिले त्यात गंभीर कलम नाहीयेत.कलम कडक लागल्याशिवाय न्याय कसा मिळणार असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला. त्या कसपटे कुटुंबियांच्या भेटीला गेल्या आहेत. मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार असल्याचे त्या म्हणाल्या.

  • 23 May 2025 10:20 AM (IST)

    पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना

    हगवणे प्रकरणात माझा काही संबंध नाही. मला विनाकारण बदनाम करण्यात येत आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तर अजितदादा आज कसपटे कुटुंबियांना जाऊन भेटणार आहे.

  • 23 May 2025 10:10 AM (IST)

    निलेश चव्हाणचा कारनामा समोर

    वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाणचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिलाय . स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह्य व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर २०१९ साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झालाय .

  • 23 May 2025 10:04 AM (IST)

    मुंबई महापालिकेसाठी भाजपाचे ‘मिशन 150’

    मुंबई महापालिकेसाठी भाजपाचे ‘मिशन 150’ चर्चेत आले आहे. तर शिंदे सेना 100 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 23 May 2025 09:56 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला; मात्र शेती उपयोगी आणि शेतमाल यांच मोठे नुकसान

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कन्नड तालुक्यातल्या हातनूर परिसरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे या परिसरात शेतजमिनी जलमय झाल्या तर दुसरीकडे शिवना,गांधारी या मुख्य नद्यांवर असणारे छोटे-मोठे कोल्हापुरी बंधारे मान्सून पूर्व झालेल्या अवकाळी ओसंडून वाहत आहे. दरम्यान सद्यस्थितीला सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळत असला तरी देखील शेतमाल आणि शेती उपयोगी वस्तूंचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

  • 23 May 2025 09:41 AM (IST)

    पाक लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही…

    काल रात्री सीमेवर शांतता, कोणत्याही घटनेची नोंद नाही… भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वठणीवर…

  • 23 May 2025 09:08 AM (IST)

    कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो ‘पीपीपी’ मॉडेलवर; महिनाअखेरपर्यंत निघणार निविदा

    बदलापूर, शीळफाटा, महापे, घनसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महिनाअखेरपर्यंत टेंडर (स्वारस्य निविदा) काढली जाणार आहे. सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) ३८ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार असून, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेनंतर मुंबईतील दुसरी पीपीपी तत्त्वावरील मेट्रो मार्गिका ठरणार. मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून, तिच्यावर एकूण १५ स्थानके असतील. या मार्गिकेला कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून, घनसोलीपर्यंत ती भूमिगत असेल. हा मार्ग ठाणे खाडीखालून जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, महिना अखेरपर्यंत एमएमआरडीएकडून स्वारस्य निविदा जाहीर होणार….

  • 23 May 2025 08:57 AM (IST)

    मान्सून पूर्व पावसाने अमरावती जिल्ह्यातील 50 गावांमधील पिकांचे नुकसान..

    मान्सून पूर्व पावसाने अमरावती जिल्ह्यातील 50 गावांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. 16 गावांमध्ये घरांचे नुकसान.

    अमरावती शहरासह ८ तालुक्यांमध्ये झालेल्या या मुसळधार अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.  पावसामुळे सुमारे 255.5 हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, कांदा, भाज्या, तीळ, टरबूज, केळी, आंबा, संत्री, भुईमूग आणि इतर पिके बाधित झाली आहेत.

  • 23 May 2025 08:45 AM (IST)

    ठाणे शहरात आढळले कोरोनाचे तीन रुग्ण

    ठाणे शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले असून महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.  सध्या हे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

    दरम्यान रुग्णांसाठी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 19 बेड स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून त्यामध्ये 15 ऑक्सीजन बेड आणि चार साधे बेड आहेत.

  • 23 May 2025 08:43 AM (IST)

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचं ‘मिशन 150’

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचं ‘मिशन 150’ तर 227 जागांपैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी नगरसेवाकांनी सज्ज रहावं अशा सूचना एकनाथ शिंदेंनी केल्या, असेही सूत्रांनी सांगितलं.

  • 23 May 2025 08:37 AM (IST)

    क्रूरकर्मा आरोपींना फाशी द्या- चित्रा वाघ यांची मागणी

    क्रूरकर्मा आरोपींना फाशी द्या, राजेंद्र आणि सुशील हगवणे यांच्या अटकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.

  • 23 May 2025 08:15 AM (IST)

    हगवणे कुटुंबियांवर मकोका लावून कडक कारवाई करा – वैष्णवीच्या पालकांची मागणी

    हगवणे कुटुंबियांवर मकोका लावून कडक कारवाई करा. त्यानंतरच माझ्या मुलीला न्याय मिळेल अशी भावना वैष्णवीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

  • 23 May 2025 08:12 AM (IST)

    वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणेंना अटक

    वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी अखेर तिचे सासरे राजेंद्र हगवणे,दीर सुशील हगवणेला पोलिसांनी अटक केली आहे.   गेले 7 दिवस दोघे फरार होते, अखेर आज पहाटे स्वारगेट येथून पोलिसांनी त्यांना स्वारगेट येथे बेड्या ठोकल्या.

Published On - May 23,2025 8:11 AM

Follow us
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.