LIVE | अमित शाहांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजेंना स्थान नाही

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच ठिकाणी

LIVE | अमित शाहांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजेंना स्थान नाही
Picture

अमित शाहांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजेंना स्थान नाही

उस्मानाबाद : अमित शाह यांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजे यांना स्थान नाही, मात्र, खुनाचा गंभीर गुन्हा नोंद असलेल्या डॉ. पदमसिंह पाटील यांना स्थान, युती असतानाही शिवसेना खासदार यांचा फोटो नसल्याने शिवसेना-भाजप वाद चिघळण्याची शक्यता

10/10/2019,9:53AM
Picture

राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे रवाना, राज यांच्या हस्ते होणारी कसबा गणपतीची आरती रद्द

पुणे : राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे रवाना, 10 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते होणारी कसबा गणपतीची आरती रद्द, पुण्यातील मनसे उमेदवारांना घेऊन राज कसबा गणपतीची आरती करणार होते, मुंबईत राज ठाकरे यांच्या आज दोन सभा

10/10/2019,9:43AM
Picture

टिटवाळ्याच्या वसुंद्री नदीत देवी विसर्जनासाठी गेलेले चार तरुण बुडाले

कल्याण : वसुंद्री नदीत चार तरुण बुडल्याची प्राथमिक माहिती, टिटवाळा मांडा परिसरातील घटना, देवी विसर्जनासाठी गेले असताना दुर्घटना, अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरू, बुडल्यापैकी विश्वास पवार, रुपेश पवार, सिद्धेश पारटे, सुमित वायदंडे अशी बुडालेल्या तरुणांची नावं आहे.

10/10/2019,9:37AM
Picture

बॅरीगेट तोडून कंटेनर पोलिसांच्या तंबूत घुसला, दोन पोलिसांचा मृत्यू

उस्मानाबाद : बॅरीगेट तोडून कंटेनर पोलिसांच्या तंबूत, अपघातात दोन पोलिसांचा जागीच मृत्यू तर एक पोलीस जखमी, येडशी उड्डाण पुलाजवळील घटना, अपघातात पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी आणि संतोष जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू

10/10/2019,8:12AM
Picture

अंबरनाथमध्ये चालत्या कारने घेतला पेट

मुंबई : अंबरनाथमध्ये चालत्या कारने पेट घेतला, चिखलोली गावाजवळची घटना, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही

10/10/2019,8:10AM
Picture

नांदेडमध्ये दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू

नांदेड : अर्धपूर तालुक्यातील बामणी गावातील दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, 16 वर्षीय गजानन कदम आणि 15 वर्षीय दीपक मंगल या मुलांचा मृत्यू, मेंढला नदीत पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू, घटनेमुळे बामणी गावावर शोककळा पसरली

10/10/2019,8:09AM
Picture

सांताक्रूझमध्ये लग्न सभागृहात भीषण आग

मुंबई : सांताक्रूझ येथील मिलन सबवेजवळ रात्री पावणेबाराच्या सुमारास एका लग्न सभागृहात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 11 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट

10/10/2019,8:06AM
Picture

भिंवडीत रस्त्यावरील खड्यामुळे डॉक्टर तरुणीचा मृत्यू

भिवंडी : वाडा येथे बीओटी तत्वावर बनवण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्याने तरुणीचा बळी घेतला, डॉ. नेहा शेख या मुलीचा दुगाड फाटा या ठिकाणी खड्यामुळे मृत्यू, खड्यात दुचाकी पडल्याने अज्ञात वाहनाने चिरडले, संतप्त नागरिकांनी अनगाव येथील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचा टोल नाका बंद पाडला

10/10/2019,8:01AM
Picture

भाजपच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिंतूरमध्ये

परभणी : जिंतूर येथील भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा, सेलू येथे योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा

10/10/2019,7:55AM
Picture

शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांना दोन दिवसांची नोटीस

मुंबई : अनधिकृत बांधाकम, बोगस कागदपत्राआधारे ग्राहक आणि शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवींची विरार पोलिसांकडून चौकशी, दळवी यांना विरार पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन दिवसांची नोटीस देऊन सोडलं, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांची माहिती, ऐन निवडणुकीत दळवी यांच्यावरील गुन्हा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता

10/10/2019,7:52AM

 

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *