Eknath Shinde : क्राईम ब्रांचच्या दोन टीम सुरत ला जाण्याच्या तयारीत, त्याच्याआधीच शिंदेचे आमदार बाहेर पडणार

क्राईम ब्रांचच्या दोन टीम सुरतला जाण्याच्या तयारीत असल्याचे कळत आहे. तर याची माहिती आधीच शिंदे यांना मिळाल्यानेच त्यांनी आपले बंडखोर आमदार हॉटेल बाहेर काढण्याचे ठरवले आहे.

Eknath Shinde : क्राईम ब्रांचच्या दोन टीम सुरत ला जाण्याच्या तयारीत, त्याच्याआधीच शिंदेचे आमदार बाहेर पडणार
एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 12:35 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजी आणि बंडच्या नाट्यानंतर अनेक विषय समोर येत आहेत. तर शिंदे यांनी आपल्या बंडखोर आमदारांना सुरक्षित स्थिळी हालवण्यासाठी सुरत येथील हॉटेल जवळ तीन बसेस लावण्यात आले आहेत. तर या आमदारांना आसामची राजधानी गुवाहाटी (Guwahati) येथे हलविण्यासाठी तीन विमानं सुरत एअरपोर्टवर सज्ज ठेवण्यात आली. यादरम्यान नवीनच माहिती समोर येत असून मुंबई क्राईम ब्रांचच्या (Mumbai Crime Branch) दोन टीम सुरत ला जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. यानंतर ही माहिती आधीच मिळाल्यानेच शिंदे यांनी आपल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटी येथे हलवत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी करत आपले वजन दाखवून दिले आहे. शिंदे यांच्याकडे बंडखोरी करणारे 30 ते 35 आमदार असल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान यात बाळापूरचे आमदार नितिन देशमुख ही आहेत. ज्यांना छातित दुखत असल्याने येथील मेरिडियन रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच उपचारानंतर त्यांची तब्बेत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान देशमुख यांच्या पत्नी प्रांजल देशमुख यांनी अकोला शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तर माझे पती बेपत्ता आहेत. त्यांना लवकर शोधावे, असे म्हटले आहे.

अरविंद सावंत यांनी त्या IPS अधिकाऱ्यांला जाब विचारला

दरम्यान शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना गुजरातमध्ये एका IPS अधिकाऱ्यानं ताब्यात ठेवल्याची माहिती मिळतेय. देशमुख यांनी शिवसेना नेते अरविंद सावंत यांना फोन करुन मला डांबून ठेवलं आहे, सोडलं जात नाही असं सांगितलं. त्यानंतर अरविंद सावंत यांनी त्या IPS अधिकाऱ्यांला जाब विचारला. त्यांना अडवून का धरलं? त्यांना प्रवास करण्यापासून का अडवलं जात आहे? तुमचं नाव काय? असा प्रश्न सावंत यांनी त्या IPS अधिकाऱ्याला विचारला. त्याची एक ऑडिओ क्लिप सध्या समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

अरविंद सावंत यांचा भाजपवर गंभीर आरोप

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा ताबा गुजरातमधील एका आयपीएस अधिकाऱ्याकडे असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केलाय. छातीत दुखत असल्यानं नितीन देशमुख यांना सूरतमध्येच दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनीही त्यांची भेट घेतली होती. मात्र दवाखान्यातून देशमुख यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता अरविंद सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय.

अकोल्याचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख सूरतमध्ये

दरम्यान अकोल्याचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख काही कार्यकर्त्यांसोबत सूरतमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, त्यांना हॉटेलबाहेरच रोखून धरण्यात आलंय. नितीन देशमुख यांना का भेटू दिलं जात नाही? तसेच ते गेले तीन तास हॉटेलच्या बाहेर बसून असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

क्राईम ब्रांचच्या दोन टीम

यानंतरच आता क्राईम ब्रांचच्या दोन टीम सुरतला जाण्याच्या तयारीत असल्याचे कळत आहे. तर याची माहिती आधीच शिंदे यांना मिळाल्यानेच त्यांनी आपले बंडखोर आमदार हॉटेल बाहेर काढण्याचे ठरवले आहे. यात त्यांना भाजपची मदत मिळत असल्याचेही आता सिद्ध झाले आहे. तर नितीन देशमुख यांच्या शोध घेण्यासाठी अकोला पोलिसांचा एक पथक सुरातसाठी रवाना झालंय. यामध्ये एक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक आता अकोल्यातून रवाना झाले आहे. जे उद्या सुरतमध्ये पोहचणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.