AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार, ऑपरेशन टायगरबाबत केंद्रातील नेत्याचा मोठा दावा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचा दावा केला आहे. आठवलेंनुसार, ठाकरे गटाचे १४ ते १५ आमदार लवकरच फुटणार आहेत, ज्यामुळे पक्षाला मोठा फटका बसेल. यापूर्वीच खासदार आणि सचिन अहिर यांनी पक्ष सोडला आहे. ही शक्यता खरी ठरल्यास ठाकरे गटाचे अर्ध्याहून अधिक आमदार शिंदे गटात जाण्याची भीती आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार, ऑपरेशन टायगरबाबत केंद्रातील नेत्याचा मोठा दावा
उद्धव ठाकरेंना पुन्हा बसणार धक्का ?
| Updated on: Jul 13, 2026 | 8:01 AM
Share

उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटले. त्यानंतर सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या सहाही खासदारांवर ठाकरे यांनी कारवाईसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नाहीत, त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लागोपाठ दोन झटके बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी तिसरा आणि सर्वात जबरदस्त झटका बसणार असल्याचं समोर आलं आहे. केंद्रातील एका बड्या नेत्याने पुण्यात मीडियाशी संवाद साधताना ठाकरे गटाचे 14 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. म्हणजे ठाकरे गटाचे निम्म्याहून जास्त आमदार फुटणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हा दावा केला आहे. आठवले काल पुण्यात होते. मीडियाशी संवाद साधताना आठवले यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनडीएकडे अनेक खासदार येत आहेत. आम्ही पक्ष फोडत आहोत असं म्हणणं चुकीचे आहे. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे खासदार आता आले आहेत. त्यांना खासदार सांभाळता येत नाहीत. टायगर ऑपरेशन वगैरे काही नाही. त्याचे ऑपरेशन आहे. एकनाथ शिंदे खरे शिवसेना नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार डावलून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे गेले. ते महायुती सोबत आले नाहीत. उद्भव ठाकरे यांच्या कडील 20 आमदारां पैकी 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला.

फडणवीसांची दिल्लीत गरज नाही

उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार.आमच्याकडे आले तर स्वागत आहे, एकनाथ शिंदे यांना विचारून निर्णय घेऊ, असं सांगतााच देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत केंद्रात येणार नाहीतय. फडणवीस सर्व घटकांना न्याय देत आहेत. त्यांची आता दिल्लीत आवश्यकत नाही, असं आठवले म्हणाले.

भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यावरही आठवले यांनी मत व्यक्त केलं. जिल्ह्यात अनेक स्थानिक वाद असतात. एकनाथ खडसे सीनियर नेते आहेत. त्याचा अमृत महोत्सव आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. ते सीनियर नेते आहेत. त्यांची दिल्लीत येण्याची इच्छा असेल तर त्यांना पक्षात घ्यावे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

राज ठाकरेंची मुलं इंग्लिश मीडियममध्ये

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे अॅक्टिव्ह नेते आहेत मराठीचा त्यांना अभिमान आहे आम्हाला पण अभिमान आहे, हिंदीमध्ये बोलूच नका. बाहेरचं एखादं शिष्टमंडळ आले तर मराठीतच बोलायचं का? हिंदीमध्ये बोलू नका हा राष्ट्रभाषेचा अपमान आहे. राज ठाकरेची मुलं इंग्लिश मीडियम शिकत आहेत. मराठी आले पाहिजे ठीक आहे. पण मुंबईमध्ये अनेक लोक येत असतात. राज ठाकरे जेवढे आक्रमक होतील तेवढे आमचा फायदा आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

राग येण्याची गरज नाही

राज ठाकरेंचे लोक निवडून येत नाहीत. आमचे लोक निवडून येत आहेत, त्यांनी एवढं आक्रमक होऊ नये. देशभरात मराठी लोक आहेत. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे अनेक लोक येतात. राज ठाकरे घटनेचा अपमान करत आहेत. मराठी विषय आणून मुंबईची इमेज खराब करू नये., मुख्यमंत्री हिंदीमध्ये बोलल्याने एवढा राग येण्याची राज ठाकरे यांना गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश