वंचितमुळे काँग्रेसचा मोठा गेम, मुंबईत महायुतीला होणार थेट फायदा
मोठी बातमी समोर येत आहे, वंचित बहुजन आघाडीला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने 62 जागा दिल्या होत्या, परंतु 16 जागांवर पक्षाला उमेदवारच न मिळाल्यानं आता वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती रिंगणामध्ये आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी केली आहे. तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची देखील युती झाल्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 62 जागा दिल्या होत्या, परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ‘वंचित’ला 16 जागांवर उमेदवारच न मिळाल्याने त्यांनी या जागा काँग्रेसला परत केल्या आहेत.
मात्र या जागांवर काँग्रेसकडूनसुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यात आले नाहीत, त्यामुळे या जागांवर थेट ठाकरे बंधू आणि युतीची लढत आता पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने दिलेल्या 62 जागांपैकी वॉर्ड क्रमांक 6, 11, 12, 13, 14, 15, 19, 21, 30, 46, 80, 84, 117, 153, 182, 198 अशा सोळा जागांवर वंचित बहुजन आघाडीला उमेदवारच मिळाला नाही, त्यामुळे या जागांवर आता वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडी – मुंबई महानगरपालिका उमेदवारांची वार्डनिहाय यादी
1. वार्ड 24 – सरोज दिलिप मगर 2. वार्ड 25 – डॉ. सलीम अहमद रियाज अहमद अन्सारी 3. वार्ड 27 – संगिता दत्तात्रय शिंगाडे 4. वार्ड 38 – तेजस्विनी उपासक गायकवाड 5. वार्ड 42 – रेवाळे मनिषा सुरेश 6. वार्ड 53 – नितीन विठ्ठल वळवी 7. वार्ड 54 – राहुल ठोके 8. वार्ड 56 – ऊषा शाम तिरपुडे 9. वार्ड 67 – पिर महमंद मुस्ताक शेख 10. वार्ड 68 – पलमजित सिंह गुंबंर 11. वार्ड 73 – स्नेहा मनोज जाधव 12. वार्ड 76 – डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर 13. वार्ड 85 – अय्यनार रामस्वामी यादव 14. वार्ड 88 – निधी संदीप मोरे 15. वार्ड 95 – विनोद कुमार रामचंद्र गुप्ता 16. वार्ड 98 – सुदर्शन पिठाजी येलवे 17. वार्ड 107 – वैशाली संजय सकपाळ 18. वार्ड 108 – अश्विनी श्रीकांत पोचे 19. वार्ड 111 – अँड रितेश केणी 20. वार्ड 113 – सुर्यकांत शंकर आमणे 21. वार्ड 114 – सिमा निनाद इंगळे 22. वार्ड 118 – सुनिता अंकुश वीर 23. वार्ड 119 – चेतन चंद्रकांत अहिरे 24. वार्ड 121 – दिक्षिता दिनेश विघ्ने 25. वार्ड 122 – विशाल विठ्ठल खंडागळे 26. वार्ड 123 – यादव राम गोविंद बलधर 27. वार्ड 124 – रीता सुहास भोसले 28. वार्ड 127 – वर्षा कैलास थोरात 29. वार्ड 139 – स्नेहल सोहनी 30. वार्ड 146 – सतिश वामन राजगुरू 31. वार्ड 155 – पवार ज्योती परशुराम 32. वार्ड 157 – सोनाली शंकर बनसोडे 33. वार्ड 160 – गौतम भिमराव हराळ 34. वार्ड 164 – आशिष प्रभु जाधव 35. वार्ड 169 – स्वप्निल राजेंद्र जवळगेकर 36. वार्ड 173 – सुगंधा राजेश सोंडे 37. वार्ड 177 – कुमुद विकास वरेकर 38. वार्ड 193 – भुषण चंद्रशेखर नागवेकर 39. वार्ड 194 – शंकर गुजेटी (अशोक गुजेटी) 40. वार्ड 195 – पवार ओमकार मोहन 41. वार्ड 196 – रचना अविनाश खुटे 42. वार्ड 197 – डोळस अस्मिता शांताराम 43. वार्ड 199 – नंदिनी गौतम जाधव 44. वार्ड 202 – प्रमोद नाना जाधव 45. वार्ड 207 – चंद्रशेखर अशोक कानडे 46. वार्ड 225 – विशाल राहुल जोंजाळ
