AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ते रात्रभर बेडसाठी गाडी घेऊन शहरभर फिरत राहीले, शेवटी गाडीतच मृत्यू, नगरची भयंकर कोरोना स्थिती

नगरमध्ये बेड न मिळाल्याने उपचारा अभावी रुग्णाचा गाडीतच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

VIDEO: ते रात्रभर बेडसाठी गाडी घेऊन शहरभर फिरत राहीले, शेवटी गाडीतच मृत्यू, नगरची भयंकर कोरोना स्थिती
| Updated on: Apr 12, 2021 | 10:22 PM
Share

अहमदनगर : एकाच दिवशी अनेक मृतदेह जळत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील दृष्यांनी राज्यभरात कोरोनाचं गांभीर्य वाढवलं. त्यानंतर नगरमधील आरोग्य यंत्रणांनी हालचाली करत उपाययोजना केल्याचा दावाही केला. मात्र, प्रत्यक्षात रुग्णांच्या अडचणींमध्ये काहीही फरक पडलेला दिसत नाहीये. नगरमध्ये बेड न मिळाल्याने उपचारा अभावी रुग्णाचा गाडीतच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. याबाबतची हकीकत सांगतानाचा मृताच्या नातेवाईकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हे भीषण वास्तव पाहून नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे (Death of Corona patient due to unavailability of beds in Ahmednagar government hospital).

रविवारी (11 एप्रिला) रात्री जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या एका रुग्णाला त्याचे नातेवाईक उपचारासाठी अहमदनगरला घेऊन आले. मात्र, जिल्हा रुग्णालयाने त्यांना बेड नसल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यांना थांबण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईक रुग्णाला घेऊन शहरातील इतर रुग्णालयांमध्ये गेले, मात्र त्यांना कुठेच बेड मिळाला नाही. अखेर बेड शोधण्यासाठी कोरोना रुग्णाला घेऊन फिरत असतानाच या रुग्णांचा मृत्यू झाला.

व्हिडीओ पाहा :

ऑक्सिजनविना दोन रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी कोलाय. दरम्यान मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतल्याने तातडीने ऑक्सिजनची टाकी बदलण्यात आली. नातेवाइकांच्या सतर्कतेमुळे इतर दोघांचा जीव वाचला.

“मुर्दाड प्रशासनाचा हलगर्जीपणा, ऑक्सिजन सिलेंडर संपला पण कर्मचाऱ्यांचं लक्षच नाही”

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी टाकी संपली. ही टाकी संपण्याआधीच नवीन टाकी जोडणे अपेक्षित होते. परंतु, अर्धातास उलटूनही कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन टाकी बदलली नाही. त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने एका आजोबांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला. तर दुसऱ्या पेशंटला त्रास होवू लागल्याने त्याला आयसीयूत हलवले मात्र उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विशाल लोळगे आणि इतरांनी रुग्णालयात धाव घेतली. ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी इतर रुग्णांकडे विचारणा केली. इतर रुग्णांनीदेखील ऑक्सिजन 15 ते 20 मिनिटांपासून बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे लोळगे यांच्यासह आजोबाच्या नातेवाइकांनीही टाकी बदलण्यासाठी कर्मचाऱ्यांचा शोध घेतला. मात्र कर्मचारी बाहेर गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. हा सर्व घटनाक्रम लोळगे यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन तातडीने टाकी बदलण्यात आली. मात्र या दरम्यान 2 रुग्णांना प्राण गमवावे लागले, तर सतर्कतेमुळे इतरांचे प्राण वाचले आहेत.

अहमदनगरमधील कोरोना स्थिती

जिल्ह्यात कोरोनाचं भीषण वास्तव आहे. अहमदनगरमध्ये आज 1998 नवे कोरोना रुग्ण आढळले. सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार पार झालीय.

एकुण रुग्णसंख्या – 1 लाख 18 हजार 45 सक्रीय रुग्ण – 13500

अहमदनगर जिल्ह्यात रेमेडेसीवरचा तुटवडा भासत आहे. रुग्णालयात बेडची देखील कमतरता आहे. बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरु आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नाही.

बेड उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा, मग रुग्णांचे हाल का?

जिल्हा प्रशासनाने रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असल्याचा दावा करत आकडेवारी जारी केलीय. मात्र, यानंतरही रुग्णांना बेडसाठी वणवण फिरावं का लागतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असताना जिल्हा प्रशासन बेड उपलब्ध का करुन देत नाहीये असाही सवाल उपस्थित होतोय.

हेही वाचा :

रोहित पवार कोरोना रुग्णांच्या मदतीला सरसावले, मतदारसंघात 300 रेमडिसीविर, 10,000 एन-95 मास्क, 650 बेडची व्यवस्था

Corona Update : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 पैकी 7 शहरे एकट्या महाराष्ट्रातील!

Maharashtra second Lockdown : महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात निर्बंध लागणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

व्हिडीओ पाहा :

Death of Corona patient due to unavailability of beds in Ahmednagar government hospital

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...