Video| भरसभेत सिगारेटचे झुरके; नागपूर महापालिकेच्या नगरसेवकाचा प्रताप

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अजय देशपांडे

Updated on: Jan 29, 2022 | 9:20 PM

नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) ऑनलाईन सभेत (online meeting) नगरेवकाने चक्क सिगारेट (Cigarettes) ओढली आहे. सिगारेट ओढत असतानाचा नगरसेवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Video| भरसभेत सिगारेटचे झुरके; नागपूर महापालिकेच्या नगरसेवकाचा प्रताप
नगरसेवकाचा सिगारेट ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल

नागपूर :  नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) ऑनलाईन सभेत (online meeting) नगरेवकाने चक्क सिगारेट (Cigarettes) ओढली आहे. सिगारेट ओढत असतानाचा नगरसेवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या नगरसेवकावर जोरदार टीका होत आहे. रमेश पुणेकर असे या नगरसेवकाचे नाव आहे. रमेश पुणेकर हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. रमेश पुणेकर यांचा भर ऑनलाईन सभेमध्ये सिगारेट पितानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आज महापालिकेची ऑनलाईन सभा पार पडली. या बैठकीमध्ये महापौर, महापालिका आयुक्त आणि इतर नगरसेवकांची उपस्थिती होती. बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट पित होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हयारल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रमेश पुणेकर यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

शहरातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक

आज नागपूर महापालिकेची ऑनलाईन सभा पार पडली. शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महापौर, आयुक्तांसह विविध पक्षातील नगरसेवकांची उपस्थिती होती. शहरातील समस्यांवर चर्चा करत असताना  काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट पित असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियामधून संतप्त भावना उमटत आहेत.

पुणेकरांवर टीकेची झोड

दरम्यान रमेश पुणेकर  यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. शहरातील समस्यांवर चर्च करण्यासाठी ही ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महापौरांसह आयुक्तांची देखील उपस्थिती होती. अशा सभेमध्ये सिगारेट पिणे योग्य आहे का? भर सभेत सिगारेट पिणाऱ्या नगरसेवकांना शहरातील समस्यांचे भान नाही  का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संबंधित बातम्या

‘Why I Killed Gandhi’ चित्रपटात अमोल कोल्हेंनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका, आता आळंदीत आत्मक्लेश!

सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा

नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI