‘Why I Killed Gandhi’ चित्रपटात अमोल कोल्हेंनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका, आता आळंदीत आत्मक्लेश!

Why I killed Gandhi चित्रपटात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी आळंदी येथे महात्मा गांधी यांच्या रक्षा स्तंभाजवळ आत्मक्लेश केला.

Jan 29, 2022 | 9:04 PM
रणजीत जाधव

| Edited By: सागर जोशी

Jan 29, 2022 | 9:04 PM

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे  यांनी  ‘मैंने गांधी को क्यों मारा’ या चित्रपटाच्या माध्यमातून नथूराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. त्यावर आपण ही भूमिका 2017 साली साकारली होती आणि चित्रपट आता प्रदर्शित होत असल्याचं कोल्हे म्हणाले आहेत.

1 / 5
त्याचबरोबर 'कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे', असं स्पष्टीकरणही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिलं होतं.

2 / 5
त्यानंतर आज अमोल कोल्हे यांनी आळंदी येथे महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्तंभ परिसरात आत्मक्लेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं कोल्हे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हे यांनी महात्मा गांधी यांच्या रक्षा स्तंभासमोर नममस्तक होत आत्मक्लेश केला.

3 / 5
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, 'जो एक सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे, जो मी 2017 मध्ये केला होता.‘व्हाय आय किल्ड गांधी’ त्यामध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं मला हे वाटतं, की अनेकांनी मला व्यक्तिशा ही गोष्ट सांगितली की, आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं खरंतर आम्हाला पसंत पडलेलं नाही'.

4 / 5
"त्यांच्या विचारांना हा धक्का लागला, त्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत पोहचवली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. 2017 मध्ये अजानतेपणे जी गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.”

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें