मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसानं दिला याचंच आश्चर्य; विनायक राऊतांचे राणेंवर प्रहार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (vinayak raut attacks narayan rane over maratha reservation)

मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसानं दिला याचंच आश्चर्य; विनायक राऊतांचे राणेंवर प्रहार
शिवसेना खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री नारायण राणे

रत्नागिरी: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे. (vinayak raut attacks narayan rane over maratha reservation)

विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिवे लावले? राणे समितीने मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला. मराठा आरक्षणाच्या समितीचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हाती दिला गेला याचंच आश्चर्य वाटलं, असे चिमटे राऊत यांनी काढले. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्हाला पंतप्रधानांनी वेळ दिला नाही. आम्ही दोन वेळा मागितली होती, पण पंतप्रधानांनी आम्हाला वेळ दिली नाही. महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचे श्रेय जावू नये म्हणून केंद्र सरकारला टोलवाटोलवी करायची होती. श्रेयवादाचा मुद्दा केंद्र सरकारने जाणूनबुजून उभा केला आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा आरणक्षावर महाविकास आघाडी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

संभाजीराजे आणि राणेंची तुलनाच होऊ शकत नाही

खासदार संभाजी छत्रपती आणि नारायण राणेंची तुलना होवू शकत नाही. संभाजीाराजेंनी मला दे, मला दे असं भांडून खासदारकी मिळवली नाही. त्यांना दिलेली खासदरकी हा बहुमान आहे. मात्र राणेंची सोशल मीडियावरून केवळ प्रसिद्धीसाठी टिवटिव सुरू आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मराठा आंदोलन करणारे नेते मराठा आरक्षण प्रश्न चिघळवण्याचे काम करत आहेत. संभाजी राजेंची संयमाची भूमिका योग्यच आणि कौतुकास्पद आहे, असंही ते म्हणाले.

राऊत मार्गदर्शक

शिवसेना खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे, त्यांचे मार्गदर्शन शिरसावंद्य मानलं जातं. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे उपदेश नेहमीच आम्हाला आदर्श आहे, असंही ते म्हणाले.

त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार

यावेळी त्यांनी मुंबई लोकलवरील बंदी योग्यच असल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीत खदखद सुरू नाही. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते असल्यानेच त्यांच्यात काही विसंवाद होवू शकतो. खदखद आहे म्हणून फुगा फुटणार असं ज्यांना वाटतंय त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आणि महाविकास आघाडी कायम रहाणार, असा दावाही त्यांनी केला.

फडणवीसांना काम नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काही काम नाही. फडणवीस यांनी नितीन गडकरी यांनी केलेल्या आवाहनाकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे तसं फडणवीस आणि प्रवीण दरेकरांना महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री दिसतायत असा टोलाही त्यांनी लगावला. (vinayak raut attacks narayan rane over maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

Sanjay Raut | परमेश्वर कुठल्याच पक्षाचा नसतो, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, प्रवीण दरेकरांचा दावा

देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात गव्हर्नर अपयशी ठरले तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडेल: राष्ट्रवादी

(vinayak raut attacks narayan rane over maratha reservation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI