AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल; विश्वजीत कदम यांचा ठाकरे गटावर पलटवार

सांगली बाबतीत नाना पटेल यांनी केलेली भावना ही कार्यकर्त्याची भावना ऐकूनच केलेली आहे. दिल्लीत काल मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट झाली. आज महाराष्ट्राच्या प्रभारींची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. काँग्रेस पक्ष आम्हाला सांगेल आणि तसेच महाविकास आघाडीत एकत्रितपणे सांगेल ते आम्हाला मान्य असेल, असं काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगितलं. ते मीडियाशी बोलत होते.

सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल; विश्वजीत कदम यांचा ठाकरे गटावर पलटवार
vishwajeet kadamImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2024 | 9:39 PM
Share

सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. ठाकरे गटाने या जागेवर उमेदवार दिला असून प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा संताप अनावर झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा नेहमी काँग्रेसकडे राहिली आहे. मात्र, ठाकरे गटाने कुरघोडी केल्याने काँग्रेसचा इगो दुखावला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. सांगलीची जागा आमची होती, आहे आणि राहीन. सांगलीची जागा काँग्रेसची आहे, हे जनावरांना सुद्धा माहीत आहे, असा टोलाच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

सांगली जिल्ह्यातील लोकांचे म्हणणं आहे की, सांगलीची जागा परंपरेनं काँग्रेसची आहे. आमचं मजबुत संघटन आहे. ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत. संजय राऊत काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवशकता नाही. सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहीत आहे, तो कुठलाही व्यक्ती किंवा सांगलीच्या एखाद्या जनावराला सुद्धा विचारलं ( संजय राऊत यांना टोला) तर तोही सांगेल की, सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे. कारण शेतकऱ्यांची जनावरं असतात. संजय राऊत कुठल्या अर्थाने बोलले मला माहित नाही, असा हल्ला विश्वजीत कदम यांनी चढवला.

सांगलीबाबत बोलू नका

सांगलीत दोनदा भाजपचा उमेदवार निवडून आलाय. त्यामुळेच बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रुपाने आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये ( उबाठा) काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घराघरात काँग्रेसची विचारधारा गेलीय. त्यामुळे इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य करू नये, असा इशाराच कदम यांनी दिला.

काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक

यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली. भास्कर जाधव यांनी आम्हाला इशारा देऊ नये. इशारा देण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस पक्ष हा सव्वाशे वर्षाचा राष्ट्रीय पक्ष आहे. इतर कुणीही सांगली बाबतीत वक्तव्य करू नये अशी माझी विनंती आहे. आज बैठकीला विशाल पाटील माझ्या सोबत होते. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यास आम्ही इच्छुक आहोत. हीच भावना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे सांगितली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा