वर्ध्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची नवी यादी जाहीर, आतापर्यंत 44 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 392 कोटी जमा

ठाकरे सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील 57 हजार 572 शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आली (Wardha farmer loan waiver scheme) होती.

वर्ध्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची नवी यादी जाहीर, आतापर्यंत 44 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 392 कोटी जमा

वर्धा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक सरकारी कामांना ब्रेक लागला होता. मात्र आता मिशन बिगेन अगेन अतंर्गत अनेक काम पूर्ववत सुरु झाली आहे. त्यानुसार वर्ध्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात आतापर्यंत 44 हजार 067 शेतकऱ्यांच्या खात्यात 392 कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच  येत्या काही दिवसात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. (Wardha farmer loan waiver scheme)

ठाकरे सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील 57 हजार 572 शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 53 हजार 400 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यापैकी 49 हजार 824 शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकीकरण करण्यात आले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

तर अद्याप 3 हजार 576 शेतकरी आधार प्रामाणिकीकरणापासून दूर आहेत. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण करण्याचे काम सुरु आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळवून देण्याच्या सूचना पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींकडून मिळाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या कामाला अधिक गती देण्यात येत आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी नव्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. यात 3 हजार 198 शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.

दरम्यान कर्जमाफी योजनेत आतापर्यंत 44 हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यात 392 कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर इतर रक्कम जमा होईल, असे सांगितले जात आहे. (Wardha farmer loan waiver scheme)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण : रोहित पवार

दगड मारलाच नाही, शेतकऱ्याचा आरोप खासदार रामदास तडस यांनी फेटाळला, अतिक्रमणावरुन राडा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *