Weather forecast : राज्यात उष्णतेची लाट, कोकणात पावसाचा अंदाज

मार्च महिना संपत आला आहे. राज्यात उन्हाचा (Temperature) कडाका वाढला असून, अनेक भागातील तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिक घराच्या बाहेर पडण्याचे टाळू लागले आहेत.

Weather forecast : राज्यात उष्णतेची लाट, कोकणात पावसाचा अंदाज
राज्यात उष्णतेची लाट Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 11:23 AM

मुंबई : मार्च महिना संपत आला आहे. राज्यात उन्हाचा (Temperature) कडाका वाढला असून, अनेक भागातील तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिक घराच्या बाहेर पडण्याचे टाळू लागले आहेत. दरम्यान पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात (Konkan)विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस (rain)पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतातील राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या देखील पुढे गेले आहे. या भागातून महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहत असल्याने राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस राहणार आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच मराठवाडय़ात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. सध्याचे वातावरण पावसासाठी पोषक बनले असून, कोकणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात उष्णतेची लाट

उत्तर भारतातील राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या देखील पुढे गेले आहे. या भागातून महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहत असल्याने राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच मराठवाडय़ात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. राज्यात उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

ढगाळ वातावरण

दरम्यान पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासोबतच पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यात पुढील तीन दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत किंचित घट होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि वाईमध्ये गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli | गद्दारी केली शिवसैनिकांनी बरोबर बाण हाणला, हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांची जयप्रकाश मुंदडांवर टीका

Devendra Bhuyar : देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी, भुयार यांची फेसबुक पोस्ट तुम्ही पाहिली का ?

JALGAON मध्ये भाजप शिवसेनेत घनकचरा प्रकल्पावरून खडाजंगी, शिवसेनेने घेतले नमते

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.