AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून राज्यसभेची संधी मिळवणारे अजित गोपछडे नेमके कोण आहेत?

भाजपकडून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे. अजित गोपछडे यांचं नाव समोर आल्यानंतर अनेकांना गोपछडे नेमके कोण आहेत? असा प्रश्न पडला आहे. गोपछडे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

भाजपकडून राज्यसभेची संधी मिळवणारे अजित गोपछडे नेमके कोण आहेत?
| Updated on: Feb 14, 2024 | 3:03 PM
Share

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपच्या गोटात राज्यसभेच्या उमेदवारीवरुन जोरदार बैठकांचं सत्र पार पडलं. त्यानंतर आज अखेर भाजपकडून राज्यसभेच्या 6 पैकी 3 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण आणि विदर्भातील भाजपचे नेते अजित गोपछडे यांचा समावेश आहे. अजित गोपछडे यांचं नाव या यादीत समोर आल्यानंतर अनेकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. गोपछडे नेमके कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडतोय. गोपछडे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे संयोजकदेखील आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपात कार्यकर्ते आहेत. ते पेशाने डॉक्टर आहेत.

कोण आहेत डॉ अजित गोपछडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे.

डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. गोपछडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि. बिड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

गोपछडे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष

भाजपच्या डॉक्टर सेलचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालकही आहेत. नांदेड लोकसभा तसेच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून त्यांचे नाव नेहमीच अग्रेसर असायचे. पण नंतर लिंगायत आणि मराठा कार्डचा विषय आला की, त्यांचे नाव मागे गेल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करुन दाखवायचे. गेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचे त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. अखेर त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून खासदार म्हणून संधी मिळाली आहे.

सुरवातीपासूनच भाजपमध्ये एकनिष्ठ असलेल्या डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे सुरु केली.

नांदेडला भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत तर जिल्ह्यात भाजपचे राजेश पवार (नायगाव), डॉ. तुषार राठोड (मुखेड), भीमराव केराम (किनवट) हे तीन आमदार आहेत. त्याचबरोबर मागील वेळेस विधानपरिषदेवर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे चार आमदार आणि एक खासदार असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता डॉ. गोपछडे यांच्या माध्यमातून आणखी एका खासदाराची भर पडणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.