AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील किंग? निकालाआधी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघाच्या मुख्यालयात भेट घेतली होती. निवडणुक निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्याआधी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील किंग? निकालाआधी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा
| Updated on: Nov 22, 2024 | 11:42 PM
Share

महाराष्ट्रात गेल्या बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता उद्या निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर वेगवेगळ्या चॅनेलचे एक्झिट पोल समोर आले. त्यानंतर काही तासांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात संघाच्या मुख्यालयात भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मोहन भागवत हे शहरात असल्याने मी त्यांना भेटायला गेलो होतो. ही एक शिष्टाचार होती.” महाराष्ट्र निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला 130 ते 156 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र एक्झिट पोलबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंतिम निकालांची प्रतीक्षा करा. आम्हाला विश्वास आहे की महाआघाडीला बहुमत मिळेल.”

फडणवीस आणि मोहन भागवत यांची 15 मिनिटांची बैठक

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांशी भेट घेतल्याने राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरु झाल्या. सर्वोच्च पदासाठी संघाचा पाठिंबा मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे अनेकांचे मत आहे. भाजपला महाराष्ट्रात स्वतःचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सर्वाधिक संख्याबळ असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद सोडलं.

या निवडणुकीत देखील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजप महाराष्ट्रातील नवीन सरकारचे नेतृत्व करेल. असा दावा सूत्रांनी केला आहे. भाजप कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी RSS चा सल्ला घेते.

या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष राहिल्यास महाराष्ट्रातील नवीन सरकारचे नेतृत्व करेल. भाजपने मित्रपक्षांसोबत सहकार्याची वृत्ती दाखवल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. विश्लेषकांच्या अंदाजानुसार पक्षाने कामगिरी केली तर ते युतीमध्ये आपले वर्चस्व बळकट करू शकेल. आदल्या दिवशी, फडणवीस यांनी 2018 च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील बिटकॉइनच्या गैरवापराच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) च्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले होते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.