पार्टी सोडू पण भाजपसोबत जाणार नाही, बड्या नेत्याचं थेट अजितदादांना आव्हान, राष्ट्रवादीमध्ये खळबळ
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्येच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते, या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता सर्व राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.
मात्र ही निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून न लढवता स्वबळावर लढवली गेली पाहिजे अशी इच्छा महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये अनेक नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर अशी इच्छा अनेक नेत्यांनी बोलून देखील दाखवली आहे. मात्र जिथे शक्य तिथे महायुती होईल आणि जिथे शक्य नसेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवू अशी भूमिका महायुतीमधी पक्षश्रेष्ठींची आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा महायुतीचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेत रामराजे निंबाळकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पार्टी सोडायला लागली तरी चालेल पण आम्ही भाजप सोबत जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर अजितदादा उपमुख्यमंत्री असूनही साखर कारखान्याचे चेअरमन होऊ शकतात, तर मग मी फलटणचा नगराध्यक्ष का होऊ शकत नाही? माझी फलटणचा नगराध्यक्ष होण्याची इच्छा आहे, असं यावेळी रामराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
दरम्यान आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, आधी पंचायत समिती निवडणुका त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुका या क्रमाने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यात आहे.
