AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत सरकारी मद्यापी कर्मचाऱ्याचा गोंधळ, मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ

ajitha leni: अजिंठा लेणीमध्ये कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी मद्याच्या नशेत आहेत. परदेशी पर्यटक फिरत असलेल्या ठिकाणी मद्यप्राशन करून काम करत असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे. त्यात मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाचा कर्मचारी दिसत आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत सरकारी मद्यापी कर्मचाऱ्याचा गोंधळ, मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ
ajitha leni
| Updated on: Jul 22, 2024 | 8:40 AM
Share

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली अजिंठा लेणी भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. या लेणीत २९ बौद्ध लेणी आहेत. इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. चौथे शतक या कालखंडात निर्मिती झालेल्या या लेणी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. यामुळे या ठिकाणावरुन देशाची प्रतिमा परदेशी पर्यटकांसमोर उंचवण्याची चांगली संधी असते. परंतु या ठिकाणी असलेले सरकारी कर्मचारी वेगळेच प्रताप करत आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात कर्मचारी मद्यप्राशन करून फिरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर प्रचंड शिविगाळ कर्मचारी करत असल्याचे दिसत आहे.

पर्यटन क्षेत्रात असे कर्मचारी कसे?

बौद्ध धर्माचा वारसा म्हणून अजिंठा लेणीची ओळख आहे. भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी अजिंठा लेणीमुळे ठळक ओळख होते. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोच्या यादीत आहे. २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा केली होती. त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. या लेण्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात आहे. यामुळे या ठिकाणी असलेले सरकारी कर्मचारी आदर्शच असायला हवे. परंतु प्रत्यक्षात वेगळेच चित्र समोर आले आहे.

अजिंठा लेणीमध्ये कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी मद्याच्या नशेत आहेत. परदेशी पर्यटक फिरत असलेल्या ठिकाणी मद्यप्राशन करून काम करत असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे. त्यात मद्यप्राशन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाचा कर्मचारी दिसत आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी भागात सरकारी कर्मचाऱ्याचा हा प्रकार उघड झाल्यामुळे पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या कामावर प्रश्न निर्माण होत आहे.

अजिंठा गावाजवळ असलेल्या या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने लावला होता. या लेणी पाहण्यासाठी जाण्यास सर्वात जवळचे स्टेशन जळगाव आहे. या ठिकाणांवरुन ४५ किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.