‘तेव्हा तर कृषीमंत्री सुद्धा याच महाराष्ट्राचे होते’, मोंदीचा यवतमाळमध्ये पवारांवर निशाणा

"आज बघा, मी एक बटन दाबलं आणि पाहतापाहता पीएम किसान सन्मान योजनेचे 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्य बँक खात्यात गेले. आकडा लहान नाही. हीच तर मोदीची गॅरंटी आहे. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि सर्वसामान्यांपर्यंत 15 पैसे पोहोचायचे", असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

'तेव्हा तर कृषीमंत्री सुद्धा याच महाराष्ट्राचे होते', मोंदीचा यवतमाळमध्ये पवारांवर निशाणा
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 7:36 PM

यवतमाळ | 28 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी ते आज यवतमाळला आले. यावेळी हजारो कोटींच्या विकासकामाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “तुम्ही आठवा, इंडिया आघाडीचं जेव्हा केंद्रात सत्ता होती तेव्हा काय स्थिती होती? तेव्हा तर कृषीमंत्री सुद्धा याच महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीहून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित व्हायचे. पण ते पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधी मध्ये लुटलं जात होतं. गाव, गरीब शेतकरी, आदिवासींना काहीच मिळायचं नाही”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

“आज बघा, मी एक बटन दाबलं आणि पाहतापाहता पीएम किसान सन्मान योजनेचे 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्य बँक खात्यात गेले. आकडा लहान नाही. हीच तर मोदीची गॅरंटी आहे. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि सर्वसामान्यांपर्यंत 15 पैसे पोहोचायचे. काँग्रेसचं सरकार असतं तर आपल्याला जे आज 21 हजार कोटी रुपये मिळाले आहेत त्यापैकी 18 हजार कोटी रुपये मधेच लुटले जाते. पण आता भाजप सरकारमध्ये गरिबांचा पूर्ण पैसे गरिबांना मिळत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

’11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे’

“मोदीची गॅरंटी आहे, प्रत्येक लाभार्थीला त्याचा अधिकार मिळाला आहे. त्यांच्या बँक खात्यात पैसा जमा व्हायला आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना डबल इंजिन सरकारची डबल गॅरंटी आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3800 कोटी रुपये वेगळे ट्रान्सफर झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे 12 हजार शेतकऱ्यांना दरवर्षी मिळत आहे. देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे जमा झाले आहेत. यातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 30 हजार कोटी आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना 900 कोटी रुपये मिळाले आहेत. तुम्ही कल्पना करा की, हे पैसे छोट्या शेतकऱ्यांना किती फायदा होत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘दहा वर्षांपूर्वी हाहा:कार होता’

“गेल्या 10 वर्षात आमचा निरंतर प्रयत्न राहिलाय की, गावात राहणारे आणि परिवारच्या नागरिकांना सर्व सुविधा द्वावे. पाणी प्रश्न सोडवावा. दहा वर्षांपूर्वी हाहा:कार होता. देशातील गावांमध्ये 100 पैकी 15 कुटुंब असे होते जिथे पाईपने पाणी जायचं. गरीब, आदिवासी आणि दलितांना ही सुविधा मिळत नव्हती. त्यामुळे लाल किल्ल्यावरुन मोदीने हर घर जलची गॅरंटी दिली होती. आज 100 पैकी 75 ग्रामीण कुटुंबांच्या घरी पाईपने पाणी पोहोचलं आहे. महाराष्ट्रात 50 लाख पेक्षा कमी परिवारांपर्यंत नळाचं कनेक्शन होतं. आज सव्वा करोड नागरिकांपर्यंत जल कलेक्शन आहे”, असा दावा मोदींनी केला.

“काँग्रेसच्या काळात आदिवासी समाजाला नेहमी सर्वात मागे ठेवलं गेलं. त्यांना सुविधा दिली नाही. पण मोदीने सर्वात मागास समाजांचा विचार केला. पहिल्यांचा त्यांच्या विकासासाठी 23 हजार कोटींची पीएम जनमत योजना सुरु झालीय. या योजनेतून महाराष्ट्राच्या कातरी, कोलाम आणि महाडिया सारख्या अनेर जनजातीय समुदायांना चांगलं जीवन देणार. गरीब, शेतकरी, जवान आणि नारीशक्तीला सशक्त करण्याचा हे अभियान आणखी वेगाने होईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.