“मतांसाठी स्वार्थासाठी हिंदुत्वादी विचारांशी पुन्हा एकदा कॉम्प्रमाईज केली”; हिंदुत्वावरून ठाकरे गटाला भाजपने निकालातच काढलं…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 8:46 PM

सत्तेसाठी ठाकरे गटाने हिंदुत्वाचे विचार बाजूला सारले आहेत. त्यामुळेच त्यांनी सावरकरांचा विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी केली आहे अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

मतांसाठी स्वार्थासाठी हिंदुत्वादी विचारांशी पुन्हा एकदा कॉम्प्रमाईज केली; हिंदुत्वावरून ठाकरे गटाला भाजपने निकालातच काढलं...

यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि विधानभवनात तैलचित्र लावण्यावरून जोरदार राजकारण तापले आहे. शिंदे गटाने त्यावरून निष्ठावंत हा मुद्दा पुढे करून शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे.

त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या आघाडीच्या चर्चा सुरु झाल्यानंतर त्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेने कशा प्रकारे टीका केली होती.

त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैव आहे की ज्या विचारावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची शाखा सुरू केली त्या मराठवाड्यात शिवसेनेचा वटवृक्ष वाढला ज्या भूमिकेतून वाढला त्या भूमिकेला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला होता.

त्यामुळे आज मला या ठिकाणी दुःखाने सांगावे लागतं आहे की, उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालची पोटी एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार स्वीकारले असल्याची जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी मराठवाड्यात शिवसेनेला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोध कसा केला होता.

त्याचे त्यांनी वेगवेगळ्या घटनामोडींसह त्यांनी संदर्भासह बोलले आहेत. सत्तेसाठी ही आघाडी केली जात असल्याची टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडीच्या चाललेल्या चर्चेवरून त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

सत्तेसाठी ठाकरे गटाने हिंदुत्वाचे विचार बाजूला सारले आहेत. त्यामुळेच त्यांनी सावरकरांचा विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी केली आहे अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेसाठी त्यांनी लाचारीची टीका करताना ते म्हणाले की, आज तर हद्द झाली आहे. मतांसाठी आणि स्वार्थासाठी हिंदुत्वादी विचारांशी पुन्हा एकदा कॉम्प्रमाईज केली आहे.

त्याचबरोबर जे-जे विचार बाळासाहेब ठाकरे यांनी मांडले होते, त्या विचारांना प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला होता. तर आज मात्र उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी लाचारी आली आहे विनाशकाले विपरित बुद्धी त्यांनी सुचली आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI