AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, या जिल्ह्यात पुढील 24 तास..

Maharashtra Rain Update : राज्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचे थैमान बघायला मिळाले. सतत पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून पंचनामे सुरू आहेत.

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, या जिल्ह्यात पुढील 24 तास..
Rain
| Updated on: Sep 30, 2025 | 7:58 AM
Share

राज्यात मोठी अतिवृष्टी झाल्याने नुकसान झाले. सध्या पंचनामे सुरू असून संकट अजूनही टळले नाही. प्रशासन अलर्ट मोडवर बघायला मिळतंय. राज्यावरील कमी दाबाचा पट्टा आता कमी होताना दिसतोय. मात्र, आजही काही भागात भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केलाय. नांदेड जिल्हात विजांच्या कडकडटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलंय. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरले.

प्रशासन अलर्ट मोडवर लोकांच्या घरात शिरले पाणी 

खबरदारी म्हणून दोन दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर, शाळा आणि समाज मंदिरात केले स्थलांतर केले. गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाने अगोदरच सतर्कतेचा इशारा दिलाय. सातत्याने पडणारा पाऊस आणि जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे गोदावरी नदी सध्या मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं.

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर

​ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीत 27 बळी गेले जखमीचा आकडा 21 वर पोहोचला असून कल्याणमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मे महिन्यापासून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल 27 जणांचा मृत्यू झाला, तर जखमींची संख्या 21 वर आहे. यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक 11 बळी कल्याण तालुक्यात गेले, त्यापाठोपाठ शहापूरमध्ये 8 आणि मुरबाडमध्ये 4 मृत्यूंची नोंद.

ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीत 27 बळी

ठाणे, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याणसह अनेक भागांत सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले, नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ. महामार्गासह शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक ठप्प; रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यात 84.1 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.