अजित पवारांनी डाव टाकला, भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार, पुण्यातील राजकारणात खळबळ
ZP Election : अजित पवारांनी पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी पुण्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे. एक बडा नेता उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. बैठकांना वेग आला आहे, युती आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महानगर पालिकेच्या निवडणुकीत पुण्यात अपयश आले आहे. अशातच आता अजित पवारांनी पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी पुण्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे. एक बडा नेता उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यात भाजपला मोठा धक्का
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार भाजपला धक्का देणार आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. खेड तालुक्यात अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे. याचा परिणाम थेट आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर होणार आहे.
राजकीय समीकरणं बदलणार
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राजकीय उलथापालथ होणार आहेत. बुट्टे यांनी गेल्या आठवड्यात अजित पवारांची भेट घेतली होती, आज पुण्यात पुन्हा एकदा ते अजित पवारांना भेटले आणि उद्या प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीची जोरदार तयारी
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरल्याचे पहायला मिळत आहे. अजित पवारांनी अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडले असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
