खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा, बक्षिसाची रक्कम वार्ड अधिकाऱ्यांच्या खिशातून

दरवर्षी मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेचं चित्र पाहायला मिळतं. मात्र, यात बदल होताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून मुंबईचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी एक घोषणा केली आहे.

खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा, बक्षिसाची रक्कम वार्ड अधिकाऱ्यांच्या खिशातून

मुंबई: दरवर्षी मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेचं चित्र पाहायला मिळतं. मात्र, यात बदल होताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून मुंबईचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे दाखवणाऱ्या (Pothole Challenge in Mumbai) नागरिकांना 500 रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे बक्षिसाची (Pothole Challenge in Mumbai) रक्कम त्या वार्डातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात येणार आहे.

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. खड्डे दाखवल्यास बक्षीस (Pothole Challenge in Mumbai) म्हणून देण्यात येणारी 500 रुपये रक्कम वार्ड अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात येणार असल्याने वार्ड अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्याची जबाबदारी त्या वार्डातील अधिकारी आणि कंत्राटदाराची असल्याची स्पष्ट भूमिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी घेतली आहे.

“पॉटहोल चॅलेंज”च्या 7 अटी

1. खड्ड्यांची तक्रार, फोटोसह केवळ “My BMC Pothole Fixit” या अॅपवरच करावी लागेल.

2. तक्रार केलेला खड्डा कमीतकमी 3 इंच खोल आणि 1 फुट लांब हवा.

3. एका खड्ड्याबाबत अनेकांनी तक्रार केली असेल, तर पहिल्या तक्रारकर्त्याला चॅलेंजचे पैसे मिळणार.

4. फिक्सीट अॅपवरुन तक्रार केलेल्या एकाच खड्ड्याची वारंवार तक्रार करता येणार नाही. तक्रार केलेला खड्डा जिओटँग करण्यात येणार आहे.

5. एका खड्ड्यासाठी देण्यात येणारी कमाल रक्कम 500 रुपये असेल.

6. 24 तासांमध्ये खड्ड्यांच्या तक्रारीचे निराकरण केले गेले, तर पैसे मिळणार नाहीत.

7. पॉटहोल चॅलेंज केवळ 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधी करताच असेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *