रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीच्या मार्गावर, अनिल अंबानींचा संचालक पदाचा राजीनामा

दुसर्‍या तिमाहीतही कंपनीला 30,142 कोटी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे

रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीच्या मार्गावर, अनिल अंबानींचा संचालक पदाचा राजीनामा

मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्सचे संचालक (Rcom) अनिल अंबानी यांनी संचालकपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स (Rcom) कंपनीला सध्या मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे (Reliance Communications). दुसर्‍या तिमाहीतही कंपनीला 30,142 कोटी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर अनिल अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला (Anil Ambani Resignation). अनिल अंबानींसोबतच कंपनीच्या चार बड्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला (Anil Ambani Resignation).

अनिल अंबानी यांच्या व्यतिरिक्त छाया विराणी, मंजरी काकेर, रायना कारानी आणि सुरेश रंगाचर यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला. अनिल अंबानी, छाया विराणी आणि मंजरी काकेर यांनी 15 नोव्हेंबरला तर रायना कारानी यांनी 14 नोव्हेंबरला राजीनामा दिला. सुरेश रंगाचर यांनी 13 नोव्हेंबरला त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषित करण्यात आले. यामध्ये जुलै ते सप्टेंबरमध्ये कंपनीला 30,142 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनी सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर असून या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 59 पैसे आहे.

चीनच्या बँका अनिल अंबानींविरोधात न्यायालयात

चीनच्या तीन मोठ्या बँकांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे मालक असलेल्या अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनच्या न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल अंबानी यांनी 680 मिलियन डॉलर म्हणजेच 47,600 कोटी रुपये थकवल्याचा आरोप या बँकांनी केला आहे. इंडस्ट्रीअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायनाने अनिल अंबानींवर हा आरोप केला आहे. अनिल अंबानींच्या वैयक्तिक हमीच्या अटीवर 2012 मध्ये 92.25 कोटी डॉलरचं कर्ज त्यांना देण्यात आलं होतं. पण, 2017 मध्ये कंपनी कर्जाची परतफेड करु शकली नाही, असा दावा या कंपन्यांनी केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *