LIVE : बाळासाहेब ठाकरेंचा 7 वा स्मृतीदिन, देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 7 वा स्मृतीदिन (Death Anniversary of Balasaheb Thackeray) असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतिर्थावर येण्यास सुरुवात झाली आहे.

LIVE : बाळासाहेब ठाकरेंचा 7 वा स्मृतीदिन, देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 7 वा स्मृतीदिन (Death Anniversary of Balasaheb Thackeray) असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतिर्थावर येण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून शिवसैनिकांचा ओघ सुरु झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची (Death Anniversary of Balasaheb Thackeray) फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभर अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.

LIVE UPDATES : 

Picture

देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी, पुष्पहार वाहून अभिवादन केलं, भाजपच्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही शिवतीर्थावर

17/11/2019,1:28PM
Picture

आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतिर्थावर दाखल, हार वाहून बाळासाहेबांना अभिवादन

17/11/2019,12:40PM
Picture

बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतिर्थावर भावनांचा जनसागर

17/11/2019,12:27PM
Picture

काँग्रेसचे नेते भाई जगताप बाळासाहेब ठाकरे यांच्या 7 व्या स्मृतीदिनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतिर्थावर पोहोचले

17/11/2019,12:13PM
Picture

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड शिवतिर्थावर दाखल, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन

17/11/2019,12:11PM
Picture

बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतिर्थावर, उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शिवतिर्थावर दाखल

17/11/2019,12:06PM

 


दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर गर्दी करतात. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करत बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस उभा केला, असं म्हणत पवारांनी ठाकरेंची आठवण काढली.


यावर्षीच्या स्मृतीदिनाला काहीशी वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. यावेळी ठाकरे कुटुंबातील पहिला ठाकरे निवडणूक मैदानात उतरुन विधानसभेत पोहचला आहे. दुसरीकडे शिवसेनेने भाजपसोबतच्या मागील 30 वर्षांपासूनच्या युतीचा मार्ग सोडत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनीच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार अशीही चर्चा सुरु होती. मात्र, तसं काही झालेलं दिसत नाही. अजूनही सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय कधी होणार हे पाहावे लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *